PM Kisan Samman Nidhi Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Samman Nidhi: KYC अपडेट केली नाही तर मिळणार नाहीत सन्मान निधीचे पैसे, ऑनलाईन अशी करा ई-केवायसी

केंद्र सरकार लवकरच 14 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

PM Kisan Samman Nidhi: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी सदस्यांना त्यांच्या खात्यांचे ई-केवायसी पडताळणी करण्यास सांगितले आहे. खातेदारांनी हे वेळेत केले नाही तर त्यांच्या खात्याचे व्यवहार बंद होऊ शकतात किंवा योजनेचे पैसे खात्यात पाठवता येणार नाहीत. केंद्र सरकार आता 14 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे.

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट वर्ग केली जाते. आता शेतकऱ्यांना चौदावा हप्ता दिला जाणार असून, परंतु त्यांना त्यांच्या खात्याचे ई केवायसी सत्यापन करावे लागणार आहे.

पीएम किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याचे पैसे मिळविण्यासाठी, प्रत्येक शेतकऱ्याला ई-केवायसीद्वारे त्याचे खाते सत्यापित करावे लागेल. पीएम किसान पोर्टलवर केवायसी करण्याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. असे सांगण्यात आले आहे की शेतकरी OTP आधारित केवायसीचा पर्याय निवडू शकतात किंवा बायोमेट्रिक आधारित केवायसी देखील करू शकतात. ही प्रक्रिया पीएम किसान पोर्टल किंवा जवळच्या सीएससी केंद्राद्वारे पूर्ण केली जाऊ शकते.

पीएम किसान पोर्टलद्वारे ऑनलाइन केवायसी करण्याची पद्धत

- सर्वप्रथम, लाभार्थी शेतकरी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर pmkisan.gov.in वर जावे.

- यानंतर वेबसाइटच्या उजव्या बाजूला असलेल्या eKYC च्या पर्यायावर क्लिक करा.

- आता आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड भरल्यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करा.

- यानंतर, आधार कार्डशी लिंक केलेला मोबाइल नंबर टाका.

- आता नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला OTP क्रमांक विहित कॉलममध्ये टाका.

- यानंतर तुमच्या पीएम किसान खात्याचे सत्यापन eKYC द्वारे पूर्ण केले जाईल.

बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी कसे करावे

- लाभार्थी शेतकरी जवळच्या CSC केंद्रात (कॉमन सर्व्हिस सेंटर) जावे.

- तुमचे आधार कार्ड पीएम किसान खात्यात अपडेट करण्यासाठी ऑपरेटरला द्या.

- यानंतर, खात्यात लॉग इन करण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत वापरा.

- आता आधार कार्ड क्रमांक अपडेट केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.

- यानंतर, केवायसी अपडेटची पुष्टी मोबाइलवर येईल आणि अशा प्रकारे ऑफलाइन केवायसी अपडेट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT