Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 10 फेब्रुवारी तारीख नोट करुन ठेवा; सरकारने केली 'ही' घोषणा

PM Kisan Samman Nidhi Update: तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर देशभरातील शेतकऱ्यांसाठी 10 फेब्रुवारी ही महत्त्वाची तारीख असल्याचे सरकारने सांगितले आहे.

Manish Jadhav

PM Kisan Samman Nidhi Scheme Latest Update: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Scheme) लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर देशभरातील शेतकऱ्यांसाठी 10 फेब्रुवारी ही महत्त्वाची तारीख असल्याचे सरकारने सांगितले आहे.

याबाबतची माहिती शासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी 13व्या हप्त्याची (PM Kisan Scheme 13th Installment) आतुरतेने वाट पाहत आहेत. होळीपूर्वी (2023) सरकार या हप्त्यातील 2000 रुपये कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणार आहे.

पुढील हप्त्यासाठी पडताळणी करावी लागेल

पीएम-किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना (Farmer) त्यांच्या बँक खात्यांचे ई-केवायसी 10 फेब्रुवारीपर्यंत करावे लागेल. माहिती देताना, या योजनेचे राज्य नोडल अधिकारी मेघराज सिंह रत्नू यांनी सांगितले की, पीएम किसानच्या लाभार्थ्यांना पुढील हप्त्याचे पैसे मिळण्यासाठी ही पडताळणी करणे आवश्यक आहे.

सरकारने सूचना दिल्या

पीएम-किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी, बँक खाते आधारशी लिंक करणे आणि आगामी हप्त्याच्या हस्तांतरणासाठी 10 फेब्रुवारी 2023 पूर्वी थेट लाभ हस्तांतरणासाठी बँक खाते सक्रिय करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भात भारत सरकारकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

1.94 लाख शेतकऱ्यांनी लिंक केले नाही

रत्नू यांनी निवेदनात म्हटले आहे की, जानेवारी 2023 पर्यंत राज्यातील या योजनेच्या लाभार्थ्यांनी 67 टक्के ई-केवायसी आणि 88 टक्के बँक (Bank) खाती आधारशी जोडली आहेत. ते पुढे म्हणाले की, सुमारे 24.45 लाख लाभार्थींनी अद्याप ई-केवायसी करणे बाकी आहे. 1.94 लाख लाभार्थ्यांनी अद्याप त्यांची बँक खाती आधारशी लिंक केलेली नाहीत.

हे काम 10 फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करा

त्यांनी सांगितले की, ज्या लाभार्थींनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही आणि त्यांचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही, त्यांनी ते 10 फेब्रुवारीपूर्वी करणे आवश्यक आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेला भारत सरकारने ई-केवायसी आणि आधार लिंक्ड बँक खाती उघडण्याची परवानगी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'ओंकार'ला घाबरून विद्यार्थी घरात, शाळेत गेलेच नाहीत; तोरसे, पत्रादेवी येथे पुन्‍हा बागायतींत मुक्त संचार

Virat Kohli Gautam Gambhir Controversy: विराट-गंभीरमध्ये पुन्हा बिनसलं? ड्रेसिंग रुममधील 'तो' व्हिडिओ पाहून चाहते चक्रावले! Watch Video

Goa Factory Fire: नेसाई औद्योगिक वसाहतीतील फॅक्टरीला भीषण आग! अग्निशमन दलाच्या तत्परतेने वाचली 10 लाखांची मालमत्ता; मोठा अनर्थ टळला

Horoscope: पैशांचा पाऊस! डिसेंबर महिना 'या' 4 राशींसाठी लकी; प्रत्येक इच्छा पूर्ण होणार, धनलाभ निश्चित

Goa ZP Elections: 'कमळ' फुलवण्यासाठी 'त्रिसूत्री' रणनीती! मित्रपक्ष मगोसह अपक्षांनाही संधी; मुख्यमंत्र्यांना विजयाची खात्री

SCROLL FOR NEXT