मोदी सरकार आपला आठवा वर्धापन दिन साजरा करत आहे, त्यामुळे या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शेतकऱ्यांना एक मोठी भेट देखील देणार आहेत. पंतप्रधान मोदी बटण दाबतील आणि 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21,000 कोटी रुपये हस्तांतरित केले जातील. पीएमओ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे होणाऱ्या गरीब कल्याण संमेलनात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM-KISAN) 11व्या हप्त्याची रक्कम हस्तांतरित करतील. (PM KISAN PM Narendra Modi to transfer Rs 21000 crore to bank accounts of 10 crore farmers)
पीएम किसानचा 11वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार,
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 11व्या हप्त्याची रक्कम हस्तांतरित करण्यासोबतच पंतप्रधान यावेळी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1.80 लाख कोटी रुपये हस्तांतरित केले गेले आहेत. खुद्द पंतप्रधान मोदींनीही या कार्यक्रमाची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केली.
पॅन किसान योजना काय आहे
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत या योजने अंतर्गत करण्यात येते. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. हे हप्ते दर चार महिन्यांनी येतात म्हणजे वर्षातून तीनदा, 2000-2000 रुपये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात.
केंद्र सरकार (Central Government) हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवले जातात. आतापर्यंत प्रत्येकी दोन हजार रुपयांचे दहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आले आहेत. 10वा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला होता. हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात येतात. या योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत 1.8 लाख कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवली आहे.
मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शिमल्यात आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे राजधानी, जिल्हा मुख्यालये आणि देशभरातील विविध राज्यांच्या कृषी विज्ञान केंद्रांमध्ये गरीब कल्याण संमेलनही आयोजित केले जात असून त्यात केंद्र सरकारचे मंत्री आणि इतर प्रतिनिधी देखील उपस्थिती लावणार आहेत. या कार्यक्रमात निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनतेशी थेट संवाद साधून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत अभिप्राय जाणून घेण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.