Farmers Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan संबंधी मोठी अपडेट, या शेतकऱ्यांना मिळणार नाही 12 व्या हप्त्याचा लाभ

PM Kisan Update: मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या पीएम किसान सन्मान निधीच्या 10 कोटीहून अधिक लाभार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे.

दैनिक गोमन्तक

PM Kisan 12th Installment: मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या पीएम किसान सन्मान निधीच्या 10 कोटीहून अधिक लाभार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा 12 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जारी केला जाईल. तथापि, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही, त्यांना 12 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. याबाबतची माहिती सरकारने यापूर्वीच दिली होती.

तुम्ही ते जवळच्या जन सुविधा केंद्रातून देखील करु शकता

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 'नोंदणीकृत शेतकरी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी (Farmers) OTP आधारित eKYC उपलब्ध आहे. ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही जवळच्या सार्वजनिक केंद्राला भेट देऊ शकता. यापूर्वी सरकारने यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून दिली होती.

शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार देण्याची तरतूद

मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पीएम किसान योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची तरतूद आहे. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. यापूर्वी 31 मे रोजी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात 11 वा हप्ता हस्तांतरित केला होता.

ई-केवायसी कसे करावे

ई-केवायसी करण्यासाठी, प्रथम पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जा, pmkisan.gov.in.

येथे फार्मर कॉर्नरवर, माऊस ओव्हर करा आणि E-KYC टॅबवर क्लिक करा.

उघडलेल्या नव्या वेब पेजवर, आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि सर्च टॅबवर क्लिक करा.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.

OTP सबमिट केल्यानंतर येथे क्लिक करा.

आधार नोंदणीकृत मोबाइल ओटीपी प्रविष्ट करा आणि तुमचे ई-केवायसी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Army Jawan Assaulted: देशरक्षकच असुरक्षित? लष्कराच्या जवानाला टोल नाक्यावर खांबाला बांधून मारहाण, 6 जण अटकेत

Heavy Rain in Goa: राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा; 100 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद

Pune-Sindhudurg Flight: पुण्यातील कोकणवासियांना बाप्पा पावला... गणेश चतुर्थीनिमित्त 'Fly91'च्या उड्डाण संख्येत वाढ, वाचा सविस्तर

Memu Special Train: कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन

कारच्या धडकेत एका मुलीसह आठ जण जिवंत जाळले; गुजरातमधील घटना

SCROLL FOR NEXT