PM Kisan Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Yojana 15th Installment: शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! दिवाळीपूर्वी येणार पीएम किसानचा 15 वा हप्ता, मात्र...

PM Kisan Yojana: तुम्ही केंद्र सरकारकडून पीएम किसानचा हप्ता मिळण्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Manish Jadhav

PM Kisan Yojana 15th Installment: तुम्ही केंद्र सरकारकडून पीएम किसानचा हप्ता मिळण्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 15 वा हप्ता दिवाळीपूर्वी मिळण्याची अपेक्षा आहे.

यावेळी 12 नोव्हेंबरला दिवाळी आहे. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याची मोदी सरकारची योजना आहे. 14 वा हप्ता जुलैमध्ये जारी करण्यात आला होता.

दरवेळेप्रमाणे यावेळीही देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान निधीच्या 15व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.

जे खाते लिंक करणार नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांची (Farmers) खाती वेगवेगळ्या पोर्टलशी लिंक नाहीत, त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत, असे सरकारकडून आधीच सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान निधी अंतर्गत, लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात.

या अंतर्गत दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. काही अपात्र शेतकरीही शासकीय योजनेचा लाभ घेत असल्याचे नुकतेच शासनाच्या निदर्शनास आले.

यानंतर शेतकऱ्यांच्या पडताळणीसाठी eKYC प्रक्रिया सुरु करण्यात आली. यासाठी भूलेख पडताळणी व्यतिरिक्त आधार सीडिंगही आवश्यक आहे. eKYC प्रक्रिया सुरु होऊन बराच काळ गेला आहे.

वर्षापूर्वी सुरु होऊनही अद्याप सर्व शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अशा परिस्थितीत ईकेवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही अजून ई-केवायसी प्रक्रिया केली नसेल, तर अशा प्रकारे पूर्ण करु शकता.

ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करावी

सर्वप्रथम पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

आता फॉर्मन कॉर्नरखालील 'e-KYC' पर्यायावर क्लिक करा.

येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती नोंदवा.

आता तुमच्या मोबाईल नंबरवर मिळालेला OTP सबमिट करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

SCROLL FOR NEXT