PM Kisan Yojana: तुम्हीही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेतर्गंत नोंदणी केली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. होय, यापूर्वी या योजनेत सरकारने काही बदल केले आहेत. या बदलांचा थेट परिणाम योजनेच्या लाभार्थ्यांवर होणार आहे.
देशातील 8.43 कोटी शेतकऱ्यांना PM किसानच्या 13व्या हप्त्याचा लाभ मिळाला. आता सरकार लवकरच 14 व्या हप्त्याचे पैसे डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यात वर्ग करणार आहे. मात्र हा हप्ता देण्याआधी सरकारने काही बदल केले आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (PM Kisan Samman Yojana) मधील लाभार्थ्याचे स्टेटस पाहण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. याशिवाय, पीएम किसानचे मोबाईल अॅप्लिकेशनही सरकारने सुरु केले आहे. यानंतर बेनिफिशियरी स्टेटसची पद्धतही बदलली आहे. आता तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस पाहायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला नोंदणी क्रमांक आवश्यक असेल.
फसवणूक रोखण्यासाठी आणि ई-केवायसी पूर्ण करण्याच्या उद्देशाने, कृषी मंत्रालयाने यापूर्वी पीएम किसान मोबाइल अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे, फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी पूर्ण केले जाऊ शकते.
अशा प्रकारे, ई-केवायसी केल्यानंतर, तुम्हाला वन टाईम पासवर्ड (OTP) आणि फिंगरप्रिंटची आवश्यकता नाही. दुसरीकडे, सरकारने यापूर्वीच 13 हप्ते जारी केले आहेत. मात्र 14 व्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दुसरीकडे, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, मोदी सरकार पीएम किसान निधीच्या 14 व्या हप्त्याचे पैसे 15 जुलैपर्यंत हस्तांतरित करु शकते. मात्र, याबाबत सरकार (Government) किंवा कृषी मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.