PM Kisan Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केली नवी सुविधा, आता 'हे' काम पूर्वीपेक्षा सोपे होणार!

PM Kisan Nidhi: तुम्हीही पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

PM Kisan Nidhi: तुम्हीही पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन सुविधा सुरु केली आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी पीएम किसान (PM Kisan) एआय-चॅटबॉट (किसान ई-मित्र) लॉन्च केले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.

कृषी सचिव मनोज आहुजा आणि अतिरिक्त कृषी सचिव प्रमोद मेहरदा हे AI चॅटबॉटच्या लॉन्चिंगला उपस्थित होते.

वन स्टेप फाउंडेशनच्या मदतीने विकसित केले आहे

कार्यक्रमादरम्यान मेहरदा यांनी चॅटबॉटच्या फीचर्सची सविस्तर माहिती दिली. सोबतच याबाबत सविस्तर सादरीकरणही करण्यात आले.

कृषी मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एआय चॅटबॉट हे 'पीएम-किसान योजने'ची कार्यक्षमता आणि पोहोच वाढवण्याच्या दिशेने एक 'महत्त्वाचे' पाऊल आहे, तसेच शेतकऱ्यांना (Farmer) त्यांच्या प्रश्नांना 'जलद, स्पष्ट आणि अचूक' उत्तरे देते.

वन स्टेप फाउंडेशन आणि भाशिनी यांच्या मदतीने एआय चॅटबॉट विकसित करण्यात आला आहे.

दरम्यान, PM-Kisan Grievance Management System मध्ये AI चॅटबॉटची ओळख करुन देण्याचा उद्देश शेतकर्‍यांना सुलभ व्यासपीठासह सक्षम करणे आहे. पहिल्या टप्प्यात, एआय चॅटबॉट शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाचे स्टेटस, पेमेंट तपशील, अपात्रतेचे स्टेटस आणि इतर योजना संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत करेल. पीएम-किसान मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे इंटीग्रेटेड आहे.

विशेष म्हणजे, हे पीएम-किसानच्या लाभार्थ्यांसाठी अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे केवळ पारदर्शकता वाढणार नाही तर शेतकऱ्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल.

माहितीनुसार, चॅटबॉट सध्या इंग्रजी, हिंदी, बंगाली, ओरिया आणि तमिळ भाषांमध्ये उपलब्ध आहे. लवकरच ते देशातील सर्व 22 अधिकृत भाषांमध्ये उपलब्ध करुन दिले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT