PM Kisan Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहात? 'ही' एक चूक पडू शकते महागात

तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आधी वाचा.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Yojana 14th Installment: देशभरातील शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. नव्या हप्त्याची रक्कम मे महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर होउ शकते.

पण अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण पीएम किसान निधीचा लाभ घेणाऱ्यांची एक चूक महागात पडू शकते.

पीएम-किसान योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात.

वर्षातून तीन वेळा दोन-दोन हजार रुपये लाभार्थीच्या बँक (Bank) खात्यात जमा केले जातात. ही योजना शेतकऱ्यांना (Farmers) काही प्रमाणात का होईना, दिलासादायक ठरली आहे.

या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठेवले आहेत. त्यात न बसणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना स्वत:च्या आर्थिक स्थितीबाबत काही गोष्टी जाहीर कराव्या लागतात.

यातील महत्त्वाची बाब इन्कम टॅक्स (Income Tax) विवरण पत्रासंबंधी आहे. म्हणजेच, एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने मागील मूल्यांकन वर्षात इन्कम टॅक्स भरलेला असेल, तर ते कुटुंब पीएम-किसान योजनेअंतर्गत लाभांसाठी पात्र ठरत नाही. त्यामुळे योजनेचा लाभ घेताना याबाबत योग्य माहिती देणे गरजेचे आहे.

ही माहिती चुकीची निघाल्यास संबंधित लाभार्थी अपात्र घोषित केला जाईल. इतकेच नव्हे, तर कायद्यानुसार त्याच्यावर दंडात्मक कारवाईही होऊ शकते.

याशिवाय त्याला आतापर्यंत दिलेले हप्तेही परत करावे लागू शकतात. लाभार्थी म्हणून डिक्लेरेशन देताना शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यायला हवी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jammu Kashmir: कठुआमध्ये भारतीय जवानांचा थरार! जैश-ए-मोहम्मदच्या 'उस्मान'चा खात्मा; पाकड्यांचा मोठा कट उधळला

Tourist Taxi Fire: पर्वरीत टुरिस्ट टॅक्सीनं घेतला पेट! पोलिस अन् स्थानिकांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Tridashanka Yoga 2026: 26 जानेवारीला आकाशात मोठा चमत्कार! बुध-अरुणचा 'त्रिदशांक योग' पालटणार 'या' 4 राशींचं नशीब; सोमवार ठरणार भाग्याचा

Shri Shantadurga Jatra: श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून, ती शांती, समन्वय आणि करुणेची मूर्तिमंत अनुभूती आहे..

टेक्नॉलॉजीचा गैरवापर की अश्लीलतेची फॅक्टरी? एलन मस्कचा 'Grok AI' वादाच्या भोवऱ्यात; 11 दिवसांत बनवले 30 लाख आक्षेपार्ह फोटो

SCROLL FOR NEXT