PM Kisan installment update for farmers Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

PM Kisan EKYC Mandatory Online Last Date: देशातील कोट्यवधी अन्नदात्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आली.

Manish Jadhav

PM Kisan Nidhi 23rd Installment: देशातील कोट्यवधी अन्नदात्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आली. पंतप्रधान किसान सम्मान निधि योजनेचा बहुप्रतीक्षित 23वा हप्ता उद्या म्हणजेच 20 जून रोजी जारी केला जाणार आहे. केंद्र सरकार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच 'डीबीटी' माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2000 रुपयांची रक्कम जमा करणार आहे. चालू खरीफ हंगामात शेतीकामांच्या खर्चासाठी शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये एकूण 6000 रुपयांची आर्थिक मदत पुरवते. उद्या जमा होणाऱ्या या नवीन लाभार्थी यादीत तुमचे नाव समाविष्ट आहे की नाही, हे शेतकरी घरबसल्या अत्यंत सोप्या पद्धतीने तपासू शकतात.

लाभार्थी यादीत आपले नाव तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर (pmkisan.gov.in) जाणे आवश्यक आहे. तिथे होमपेजवर उपलब्ध असलेल्या 'फार्मर्स कॉर्नर' (Farmers Corner) या विभागात जाऊन 'बेनिफिशिअरी लिस्ट' (Beneficiary List) या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर स्क्रीनवर विचारल्याप्रमाणे आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव काळजीपूर्वक निवडावे. ही सर्व माहिती भरल्यानंतर 'गेट रिपोर्ट' (Get Report) वर क्लिक करताच संबंधित गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांची संपूर्ण यादी स्क्रीनवर दिसेल, ज्यामध्ये शेतकरी आपले नाव तपासू शकतात.

सरकारने या योजनेतील संभाव्य फसवणूक आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी ई-केवाईसी (e-KYC) प्रक्रिया पूर्णपणे अनिवार्य केली. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली ई-केवाईसी पूर्ण केलेली नाही, त्यांचा उद्या येणारा 2000 रुपयांचा हप्ता अडकू शकतो. शेतकरी आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन किंवा पीएम किसान पोर्टलवर ओटीपीच्या (OTP) माध्यमातून बायोमेट्रिक किंवा फेस ऑथेंटिकेशनद्वारे ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करु शकतात.

ई-केवाईसीसोबतच शेतकऱ्यांच्या (Farmer) नावे असलेल्या शेतजमिनीच्या कागदपत्रांची सरकारी दप्तरी पडताळणी म्हणजेच 'लँड सीडिंग' (Land Seeding) झालेली असणे आणि 'नो युअर स्टेटस'मध्ये तिथे 'Yes' लिहिलेले असणे गरजेचे आहे. तसेच बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि त्यावर डीबीटी सेवा सक्रिय असणे बंधनकारक आहे. जर सर्व तांत्रिक बाबी योग्य असूनही खात्यात पैसे आले नाहीत, तर शेतकरी 155261 किंवा 1800115526 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करुन अथवा pmkisan-ict@gov.in वर ईमेलद्वारे तक्रार नोंदवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

SCROLL FOR NEXT