Farmer Danik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले, 12 वा हप्ता खात्यात झाला जमा; त्वरित तपासा

PM Kisan Update: दिवाळीपूर्वी देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे.

दैनिक गोमन्तक

PM Kisan 12th Installment: दिवाळीपूर्वी देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. पंतप्रधान मोदींनी पीएम किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्यासाठी पैसे जारी केले आहेत. योजनेअंतर्गत 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत तुम्ही लाभार्थी असाल तर तुमचे खाते तात्काळ तपासा. पैसे आले आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खाते ऑनलाइन तपासू शकता.

16 हजार कोटी हस्तांतरित

यापूर्वी, 11 वा हप्ता 31 मे 2022 रोजी पीएम मोदींनी शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात हस्तांतरित केला होता. 17 ऑक्टोबर रोजी भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR), पुसा येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान PM मोदींनी DBT द्वारे 12 वा हप्ता जारी केला. पीएम मोदींनी डीबीटीद्वारे 16 हजार कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली. यादरम्यान, पंतप्रधानांनी शेतकरी आणि कृषी स्टार्टअप्स, संशोधक, धोरणकर्ते, बँकर्स आणि इतर भागधारकांना संबोधित केले.

ऑनलाइन स्टेटस तपासा

सर्वप्रथम पीएम किसानच्या https://pmkisan.gov.in/ वेबसाइटवर जा.

इथे उजव्या बाजूला 'Farmers Corner' मध्ये 'Beneficiary Status' हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

नवीन वेब पेज उघडल्यानंतर, मोबाईल क्रमांक/नोंदणी क्रमांकामधून कोणताही एक पर्याय निवडा. याद्वारे तुम्ही खात्यात पैसे आले की नाही हे तपासू शकता.

तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा नंबर एंटर करा. त्यानंतर 'Get Data' वर क्लिक करा.

इथे क्लिक करुन, तुम्हाला सर्व व्यवहाराची माहिती मिळेल. येथून तुम्हाला कळेल की तुमचा हप्ता निघाला आहे की नाही.

अशा शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये!

जे ई-केवायसी करणार नाहीत त्यांना 12 व्या हप्त्याचे पैसे पाठवले जाणार नाहीत, असे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. जर काही कारणास्तव 11व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले नाहीत आणि यावेळी तुम्ही ई-केवायसी पूर्ण केले असेल तर तुमच्या खात्यात 4000 रुपये आले असतील. यापैकी 2000 रुपये 11 व्या हप्त्यासाठी आणि 2000 रुपये 12 व्या हप्त्यासाठी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT