Plastic Currency in the World: देशभरात पुन्हा नोटबंदीसारखी स्थिती निर्माण झाली? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. कारण 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा नुकतीच RBI कडून करण्यात आली.
आता, 30 सप्टेंबरपर्यंत देशातील 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. बरेच लोक याला नोटाबंदी-2 म्हणत आहेत.
दुसरीकडे, सरकारशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, 2 हजाराच्या नोटेमुळे देशात ब्लॅक मनी वाढण्याची शक्यता होती.
यासोबतच, या कागदी नोटांचे आयुर्मानही पूर्ण झाले. त्यामुळे हे पाऊल उचलणे गरजेचे होते, असेही सांगितले जात आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे देशात पुन्हा एकदा चलनी नोटांची चर्चा सुरु झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, जगात 23 देश असे आहेत, जिथे कागदाच्या नव्हे तर प्लास्टिकच्या नोटा चालतात.
यापैकी 6 देशांनी त्यांच्या चलनात पूर्णपणे प्लास्टिकच्या नोटा बदलल्या आहेत. तुम्हाला धक्का बसेल, पण हे पूर्णपणे सत्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सविस्तर सांगणार आहोत.
1988 मध्ये प्लॅस्टिक चलन सुरु करणारा ऑस्ट्रेलिया (Australia) हा जगातील पहिला देश होता. जगातील हा एकमेव देश आहे, जिथे पॉलिमर नोटा तयार होतात. या नोटा इतर देशांमध्येही निर्यात केल्या जातात.
न्यूझीलंड हा ऑस्ट्रेलियाचा शेजारी देश आहे. 1999 मध्ये त्यांनी कागदी चलना (Plastic Currency in The World) च्या जागी पॉलिमर म्हणजेच प्लास्टिक चलन आणले होते. या चलनाला तिथे 'न्यूझीलंड डॉलर' म्हणतात. तिथे अशी सर्वात लहान नोट 5 डॉलरची आणि सर्वात मोठी 100 डॉलरची आहे.
पापुआ न्यू गिनी हा पॅसिफिक महासागरातील एक छोटासा देश आहे. 1949 मध्ये ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य मिळाले. असे असूनही, सन 1975 पर्यंत, ऑस्ट्रेलियन डॉलरचे चलन तिथे कार्यरत राहिले.
यानंतर त्यांनी कीना (Plastic Currency in The World) या रुपात नवीन चलन स्वीकारले. सन 2000 च्या सुमारास हे चलन प्लास्टिकच्या नोटांनी बदलले.
ब्रुनेई हा आग्नेय आशियात वसलेला एक छोटा मुस्लिम देश आहे. या देशाची गणना जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये केली जाते. तेथील चलनाला ब्रुनेई डॉलर म्हणतात. देशात बनावट नोटांची प्रकरणे वाढल्यानंतर ब्रुनेईनेही प्लास्टिकच्या नोटांचा वापर सुरु केला.
व्हिएतनाम (Vietnam) हा आग्नेय आशियातील एक देश आहे. त्यांनी 2003 मध्ये जगात प्लास्टिक चलन सुरु केले, ज्याला व्हिएतनामी डोंग म्हणतात. तिथली सर्वात मोठी नोट 5 लाख आहे, जी 20 अमेरिकन डॉलर्स इतकी मानली जाते.
प्लास्टिकच्या नोटा स्वीकारणारा रोमानिया हा युरोपमधील पहिला आणि एकमेव देश आहे. त्या देशाच्या चलनाला रोमानियन ल्यू म्हणतात. 2005 मध्येच सरकारने रोमानियाच्या चलनी नोटा पॉलिमर नोट्समध्ये बदलल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.