2000 Rupee Dainik Gomantak
अर्थविश्व

2000 Rupee Note Ban: '2000 रुपयांच्या नोटा बंद करा...' भाजपच्या या नेत्याने संसदेत केली मागणी

Indian Currency: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, 'बाजारात गुलाबी रंगाच्या 2000 रुपयांच्या नोटा दिसणे दुर्मिळ झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Sushil Kumar Modi On 2000 Rupee Note: भाजपच्या एका खासदाराने सोमवारी राज्यसभेत दावा केला की, 2,000 रुपयांच्या नोटांचा वापर गुन्हेगारी कृत्यांमध्ये आणि बेकायदेशीर व्यापारात मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्यामुळे सरकारने त्याचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करावा. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. 'बाजारात 2000 रुपयांच्या नोटा दिसणे दुर्मिळ झाले आहे. सरकारने यासंदर्भात स्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

2016 मध्ये नोटाबंदी झाली

मोदी सरकारने (Modi Government) 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. या अंतर्गत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बेकायदेशीर ठरवून चलनातून बाद ठरवण्यात आल्या होत्या. काही दिवसांनंतर सरकारने त्याच्या जागी 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या होत्या. दुसरीकडे, मोदींनी दावा केला की, 'गेल्या तीन वर्षांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात 2,000 रुपयांच्या बनावट नोटाही जप्त केल्या जात आहेत.'

ते पुढे म्हणाले की, 'चीन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन युनियनमध्येही नोटांचे कमाल मूल्य केवळ 200 पर्यंत आहे. तर पाकिस्तान आणि श्रीलंका सारख्या देशांमध्ये 5,000 रुपयांच्या नोटा आहेत. इंडोनेशियामध्ये 1 लाख रुपयांच्या नोटा चलनात आहेत.'

ते पुढे असेही म्हणाले की, 'भारतात 2000 च्या नोटा चलनात आणण्याला आता काही अर्थ नाही. आता सरकार डिजिटल व्यवहारांनाही प्रोत्साहन देत आहे. म्हणूनच मी सरकारला विनंती करतो की, 2,000 च्या नोटा टप्प्याटप्प्याने बंद कराव्यात.' एक-दोन वर्षात 2 हजाराच्या नोटा बदलून इतर नोटा आणता याव्यात, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. ते शेवटी म्हणाले की, '2 हजाराची नोट म्हणजे काळा पैसा म्हणजे काळाबाजार. काळ्या पैशावर बंदी आणायची असेल तर 2000 च्या नोटेवर बंदी घालावी लागेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

Sheikh Hasina: "माझी हत्या होऊ शकते, पण तरीही मी...," शेख हसीना बांगलादेशला परतणार; कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! महागाई भत्त्याच्या वाढीचा मार्ग मोकळा, आता 63 टक्के DA मिळण्याची शक्यता; जाणून घ्या गणनेचे सूत्र

SCROLL FOR NEXT