Tablets Dainik Gomantak
अर्थविश्व

Pharmeasy औषधी कंपनी Thyrocare ला 4546 कोटींना करणार खरेदी

फार्मईजी ही कंपनी प्रत्यक्षात औषधांचे वितरण करते तर थायरोकेअरकडे 4,000 प्रयोगशाळांचे एक मोठे नेटवर्क आहे

दैनिक गोमन्तक

डिजिटल हेल्थकेअर कंपनी फार्मईजीने शुक्रवारी 6300 कोटी रुपयांच्या एका व्यवहारामध्ये सुप्रसिद्ध डायग्नोस्टिक कंपनी चालविणारी थायरोकेयर टेक्नोलॉजीज ही कंपनी ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे . या करारामध्ये थायरोकेयरचे 62 वर्षीय संस्थापक ए वेलुमानी कडून नियंत्रित भागीदारी खरेदी करण्याचा ठराव देखिल समाविष्ट आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार , फार्मईजीची सहयोगी कंपनी एपीआय होल्डिंग ही पुण्याजवळ असणारया थायरोकेयरचे 66.1 टक्के शेअर 1300 रुपये प्रति शेअरने खरेदी करणार असून ज्याची एकूण खरेदी किंमत 4546 कोटी रुपये इतकी आहे.

याशिवाय एपीआय एका ओपन ऑफर अंतर्गत थायरोकेयरमध्ये अतिरिक्त 26 टक्के हिस्सा संपादन करेल आणि त्यासाठी 1788 कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला आहे .तसेच एका आणखीन वेगळ्या व्यवहारामध्ये वेलुमानी यांना एपीआयमध्ये पाच टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.यावर प्रतिक्रिया देताना एपीआय होल्डिंगचे मुख्य कार्यकारी सिद्धार्थ शहा म्हणाले की, "हा एक धाडसी निर्णय आहे, ज्यामध्ये त्यांची सात वर्षांची कंपनी 25 वर्षीय थिरोकेयरची खरेदी करीत आहे. तसेच हा करार फर्मएसीच्या उत्पादनांना आणि थायरोकेयरच्या सेवेच्या प्रस्तावांना एकत्रित करेल, जेणेकरून भारतातील 70 टक्के लोकांना 24 तासांच्या आत रक्त निदान अहवाल आणि औषधे उपलब्ध असतील."

सध्या फार्मईजी ही कंपनी प्रत्यक्षात औषधांचे वितरण करते तर थायरोकेअरकडे 4,000 प्रयोगशाळांचे एक मोठे नेटवर्क आहे. तर फार्मईजीकडे 6000 डिजिटल समुपदेशन दवाखाने आणि 90,000 किरकोळ भागीदार विकेते हे 17 दशलक्ष ग्राहकांना सेवा देतात.

एकूणच काय तर या दोन औषधी क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्या एकत्र आल्यामुळे वैद्यकीय आणि औषधी क्षेत्र अधिक सुलभ होईल हे मात्र नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वडिलांनी फोन काढून घेतला, मुलाचा संताप अनावर; मोबाईलच्या वेडापायी उचललं 'चुकीचं पाऊल'

आईचा आदर न करणारा व्यक्ती भारतमातेचा काय आदर करणार? राहुल गांधी आई सोनिया गांधींवर ओरडायचे; विश्वजीत राणेंनी सांगितला किस्सा

फिश मिल प्लांटला कुंकळ्ळी पालिकेचा नकार, सरकारने दुर्लक्ष केल्यास थेट आंदोलनाचा इशारा; LoP युरी

Nepal PM Resigned: केपी शर्मा ओली यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, Gen-Z च्या हिंसक आंदोलनानंतर नेपाळमध्ये सत्तांतर

Marcus Stoinis Engagement: मार्कस स्टॉइनिस साराच्या प्रेमात, भर समुद्रात दोघांनी एकमेकांना केलं प्रपोज, पाहा रोमँटिक PHOTOS

SCROLL FOR NEXT