Money Dainik Gomantak
अर्थविश्व

EPFO Update: सरकार तुमच्या खात्यावर पाठवणार 81,000 रुपये! जाणून घ्या तारीख

EPF Balance Check: EPFO ​​च्या 7 कोटी ग्राहकांसाठी या महिन्याच्या अखेरीस मोठी बातमी येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Employees Provident Fund: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या म्हणजेच EPFO ​​च्या 7 कोटी ग्राहकांसाठी या महिन्याच्या अखेरीस मोठी बातमी येणार आहे. सरकार आर्थिक वर्ष 2022 चे व्याज EPF खातेधारकांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहे. यावेळी 8.1 टक्के दराने व्याज मिळेल.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने आर्थिक वर्ष 2022 मध्ये पीएफ (PF) खात्यावर मिळालेल्या व्याजाची गणना केली आहे. लवकरच ते खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित केले जाईल. यावेळी सरकारच्या (Government) खात्यात जमा झालेले 72,000 कोटी रुपये नोकरदारांच्या खात्यावर पाठवले जाणार आहेत.

पैसे कधी हस्तांतरित केले जातील?

गेल्या वर्षी लोकांना व्याजासाठी 6 ते 8 महिने प्रतीक्षा करावी लागली होती. यंदा सरकार दिरंगाई करणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिन्याच्या अखेरीस व्याजाचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात. मात्र या वर्षीचे व्याज 40 वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे.

व्याजाची गणना अगदी सोपी आहे

जर तुमच्या पीएफ खात्यात 10 लाख रुपये असतील तर तुम्हाला 81,000 रुपये व्याज मिळेल.

तुमच्या पीएफ खात्यात 7 लाख रुपये असल्यास तुम्हाला 56,700 रुपये व्याज मिळेल.

तुमच्या पीएफ खात्यात 5 लाख रुपये असल्यास 40,500 रुपये व्याज म्हणून येतील.

तुमच्या खात्यात एक लाख रुपये असतील तर 8,100 रुपये येतील.

1. मिस्ड कॉलमधून शिल्लक जाणून घ्या

तुमचे पीएफ पैसे चेक करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरुन 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर, तुम्हाला EPFO ​​च्या मेसेजद्वारे पीएफची माहिती मिळेल. इथे तुमचा UAN, PAN आणि आधार लिंक असणे देखील आवश्यक आहे.

2. ऑनलाइन शिल्लक तपासा

1. ऑनलाइन शिल्लक तपासण्यासाठी, EPFO ​​वेबसाइटवर लॉग इन करा, epfindia.gov.in वर ई-पासबुकवर क्लिक करा.

2. आता तुमच्या ई-पासबुकवर क्लिक केल्यावर passbook.epfindia.gov.in वर एक नवीन पेज येईल.

3. आता इथे तुम्ही तुमचे युजरनेम (UAN नंबर), पासवर्ड टाका.

4. सर्व तपशील भरल्यानंतर, तुम्ही एका नवीन पेजवर याल आणि इथे तुम्हाला मेंबर आयडी निवडावा लागेल.

5. इथे तुम्हाला तुमची ईपीएफ शिल्लक ई-पासबुकवर मिळेल.

3. UMANG App वरही शिल्लक तपासता येते

1. यासाठी, तुम्ही तुमचे UMANG App (युनिफाइड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स) खोला आणि EPFO ​​वर क्लिक करा.

2. आता दुसऱ्या पेजवर, कर्मचारी-केंद्रित सेवांवर क्लिक करा.

3. इथे तुम्ही 'View Passbook' वर क्लिक करा. यासह, तुम्ही तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्ड (OTP) क्रमांक टाका.

4. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. यानंतर तुम्ही तुमचा पीएफ शिल्लक तपासू शकता.

4. SMS द्वारे शिल्लक तपासा

जर तुमचा UAN क्रमांक EPFO ​​मध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही तुमच्या PF शिल्लकची माहिती मेसेजद्वारे मिळवू शकता. यासाठी तुम्हाला EPFOHO ला 7738299899 वर पाठवावे लागेल. यानंतर तुम्हाला मेसेजद्वारे पीएफची माहिती मिळेल. जर तुम्हाला हिंदी भाषेत माहिती हवी असेल तर तुम्हाला ती EPFOHO UAN लिहून पाठवावी लागेल. पीएफ बॅलन्सबद्दल जाणून घेण्याची ही सेवा इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि बंगालीमध्ये उपलब्ध आहे. पीएफ बॅलन्ससाठी तुमचा UAN, बँक खाते, PAN आणि आधार (AADHAR) लिंक करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

SCROLL FOR NEXT