PM Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

EPFO: मोदी सरकारने दिली आनंदाची बातमी, PF वरील व्याज वाढलं; 6 कोटी नोकरदारांच्या...

PF Balance Check: केंद्र सरकारने आज 6 कोटी नोकरदारांना आनंदाची बातमी दिली आहे. तुम्हीही नोकरी करत असाल तर आतापासून तुम्हाला पीएफवर अधिक व्याजाचा लाभ मिळेल.

Manish Jadhav

PF Balance Check: केंद्र सरकारने आज 6 कोटी नोकरदारांना आनंदाची बातमी दिली आहे. तुम्हीही नोकरी करत असाल तर आतापासून तुम्हाला पीएफवर अधिक व्याजाचा लाभ मिळेल.

सरकारने (Government) 2022-23 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत ठेवींवर 8.15 टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे.

आता लवकरच नोकरदारांच्या खात्यात पैसे येणार आहेत, त्याआधी तुम्ही खात्यातील शिल्लक तपासा. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक अनेक प्रकारे तपासू शकता.

अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले

अधिकृत आदेशानुसार, EPFO ​​ने आपल्या प्रादेशिक कार्यालयांना 2022-23 साठी EPF वर 8.15 टक्के दराने व्याज सभासदांच्या खात्यात जमा करण्यास सांगितले आहे. व्याजदरावर अर्थ मंत्रालयाच्या संमतीनंतर हा आदेश आला आहे. आता EPFO ​​ची प्रादेशिक कार्यालये ग्राहकांच्या खात्यात व्याज पाठवणार आहेत.

एसएमएसद्वारे शिल्लक तपासा

मिस्ड कॉल सेवेप्रमाणे, येथे तुमची सर्व महत्त्वाची कागदपत्रे UAN शी लिंक केली पाहिजे, तरच तुम्ही ही सेवा वापरु शकाल. यासाठी तुम्हाला EPFOHO UAN ENG (किंवा ENG ऐवजी तुम्हाला ज्या भाषेत मेसेज हवा आहे त्याचा कोड लिहा) 7738299899 वर एसएमएस करावा लागेल.

उमंग अॅपवरुन शिल्लक तपासा-

>> Play Store/App Store वरुन अॅप्लिकेशन डाउनलोड करा.

>> तुमच्या स्मार्टफोनवर उमंग अॅप सुरु करा आणि EPFO ​​निवडा.

>> 'Employee Centric Services' वर क्लिक करा.

>> तुमची ईपीएफ शिल्लक तपासण्यासाठी 'व्यू पासबुक' वर क्लिक करा.

>> तुमचा UAN एंटर करा आणि UAN वर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवण्यासाठी Get OTP वर क्लिक करा.

>> OTP टाका आणि 'लॉगिन' वर क्लिक करा.

>> ज्या कंपनीसाठी तुम्हाला ईपीएफ शिल्लक तपासायची आहे, त्या कंपनीचा सदस्य आयडी निवडा.

>> तुमचे पासबुक तुमच्या EPF बॅलन्ससह स्क्रीनवर दिसेल.

ईपीएफओ पोर्टलवरुन शिल्लक तपासा-

>> EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइटवर जा- www.epfindia.gov.in.

>> 'आमच्या सेवा' टॅबमधून, 'कर्मचाऱ्यांसाठी' वर क्लिक करा.

>> तुमचा UAN आणि पासवर्ड वापरुन लॉगिन करा.

>> लॉगिन केल्यानंतर तुम्ही तुमचे EPF खाते पाहू शकता.

>> यानंतर, तुम्हाला ज्या संस्थेचे पासबुक तपासायचे आहे, त्या संस्थेचे पासबुक तपासून तुम्ही पीएफ खात्यात जमा झालेली रक्कम पाहू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: तयारीला लागा! पावसाचे सावट दूर होणार, पुढील आठवडा कोरडा; तुलसी विवाहाचा मार्ग मोकळा

Venkateswara Temple Stampede: आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; नऊ भाविकांचा मृत्यू Video

Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

Goa Today's News Live: केळशीचे सरपंच डिक्सन वाझ बाणावलीतून लढवणार विधानसभा निवडणूक

Karvi Flowers: श्री गणेशाने हत्तीचे रूप घेतले, मुरुगन आणि वल्लीचे लग्न झाले; गोव्यात फुलणाऱ्या 'कारवी'चे महत्व

SCROLL FOR NEXT