Petrol-diesel Dainik Gomantak
अर्थविश्व

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा गगनाला भिडणार ?

जर तुम्हाला तेलाच्या (Petrol-diesel) किमती स्थिर असल्याचा आनंद होत असेल तर, तुमचा आनंद लवकरच मावळणार आहे.

दैनिक गोमन्तक

जर तुम्हाला तेलाच्या किमती स्थिर असल्याचा आनंद होत असेल तर, तुमचा आनंद लवकरच मावळणार आहे. पेट्रोल-डिझेलचे (Petrol and Diesel) दर पुन्हा वाढू शकतात. कारण कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये विक्रमी वाढ होत असताना दुसरीकडे देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लवकरच संपणार आहेत. अशा स्थितीत पुढील आठवड्यात पुन्हा भाववाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Petrol Diesel Prices May Rise Again)

दरम्यान, ही वाढ आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींमध्ये प्रति बॅरल 100 डॉलरच्या वाढीमुळे निर्माण झालेले 9 रुपये प्रति लिटरचे अंतर भरुन काढण्यासाठी असणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती 2014 नंतर प्रथमच प्रति बॅरल $110 च्या आसपास पोहोचल्या आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेल (PPAC) नुसार, भारतातील कच्च्या तेलाची खरेदी 1 मार्च रोजी प्रति बॅरल $ 102 च्या वर होती, जी ऑगस्ट 2014 नंतरची सर्वाधिक आहे.

तसेच, जेपी मॉर्गन यांनी एका अहवालात म्हटले आहे की, "पुढील आठवड्यात पाच राज्यांमधील निवडणुका संपल्यानंतर तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL). HPCL) पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 5.7 रुपये तोटा सहन करत आहे.

दुसरीकडे, ब्रोकरेज हाऊसने म्हटले आहे की, तेल कंपन्यांना त्यांचा सरासरी नफा पूर्ण करण्यासाठी किरकोळ किमती प्रति लिटर 9 रुपये किंवा 10 टक्क्यांनी वाढवणे आवश्यक आहे.

शिवाय, उत्पादन शुल्क कपात (Rs. 1-3 per liter) आणि किरकोळ किमतीत वाढ ( 5-8 Rs. Per liter) यांचे संयोजन अपेक्षित आहे, ज्यामुळे तेलाच्या किमतीतील तूट $100 प्रति बॅरल भरुन काढण्यास मदत होईल. रशिया युरोपच्या नैसर्गिक वायूपैकी एक तृतीयांश आणि जागतिक तेल उत्पादनाच्या सुमारे 10 टक्के उत्पादन करतो. तर युरोपला (Europe) रशियन गॅसचा एक तृतीयांश भाग युक्रेनमधून पाइपलाइनद्वारे मिळतो. अशा स्थितीत रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या तणावादरम्यान कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT