Peter Elbers Dainik Gomantak
अर्थविश्व

पीटर एल्बर्स बनले इंडिगोचे नवे CEO

एअर फ्रान्स-केएलएमचे पूर्व सीईओ पीटर अल्बर्स (Peter Elbers) इंडिगोचे नवीन सीईओ असतील. कंपनीने बुधवारी ही घोषणा केली.

दैनिक गोमन्तक

Indigo CEO: एअर फ्रान्स-केएलएमचे पूर्व सीईओ पीटर अल्बर्स (Peter Elbers) इंडिगोचे नवीन सीईओ असतील. कंपनीने बुधवारी ही घोषणा केली. त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती यावर्षी 1 ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे.

IndiGo चे सध्याचे CEO रोनोजॉय दत्ता 30 सप्टेंबर 2022 रोजी निवृत्त होणार आहेत. कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, दत्ता यांच्यानंतर अल्बर्स हे कंपनीचे नवे सीईओ असतील.

बोर्डाने सीईओच्या नियुक्तीला मान्यता दिली

भारतातील (India) सर्वात मोठ्या एअरलाइनने सांगितले की, “कंपनीच्या संचालक मंडळाने आज 18 मे रोजी झालेल्या बैठकीत पीटर अल्बर्स यांची कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे.'' त्यासाठी नियामक आणि भागधारकांची मान्यता घ्यावी लागणार आहे. "बोर्डाने 30 सप्टेंबरपासून संपूर्ण वेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रोनोजॉय दत्ता यांच्या राजीनाम्याचीही दखल घेतली आहे," असे कंपनीने म्हटले आहे.

कोण आहे पीटर एल्बर्स

52 वर्षीय अल्बर्स यांनी केएलएम रॉयल डच एअरलाइन्सचे अध्यक्ष आणि सीईओ म्हणून काम केले आहे. ते एअर फ्रान्स - KLM ग्रुपच्या कार्यकारी समितीचे सदस्य देखील आहेत. त्‍यांनी 1992 मध्‍ये KLM मध्‍ये करिअरची सुरुवात शिफो हबमधून केली. त्यानंतर ते नेदरलँड (Netherlands) आणि परदेशात जपान (Japan), ग्रीस, इटलीमध्ये अनेक व्यवस्थापकीय पदे भूषवली. नंतर, ते नेदरलँडला परत आले. नेटवर्क आणि अलायन्समध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. 2011 मध्ये त्यांना चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून बढती मिळाली. अल्बर्स यांचा जन्म नेदरलँड्समधील शिडॅममध्ये झाला. त्यांनी लॉजिस्टिक मॅनेजमेंटमध्ये बॅचलर डिग्री आणि बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे.

अल्बर्स काय म्हणाले?

IndiGo चे CEO म्हणून त्यांच्या नियुक्तीबद्दल भाष्य करताना, अल्बर्स म्हणाले, “गेल्या 16 वर्षांमध्ये इंडिगोचे कर्मचारी आणि नेतृत्व यांनी प्रत्येक मानकावर जे काही निर्माण केले, ते खरोखरच नेत्रदीपक आहे. इंडिगोच्या पुढच्या टप्प्यातील अविश्वसनीय प्रवासाचा एक भाग बनून मला खूप आनंद होत आहे.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT