fake Paytm

 
Dainik Gomantak
अर्थविश्व

बनावट पेटीएम अ‍ॅपचा ठरू शकता तुम्हीही बळी, असे घोटाळे कसे टाळायचे?

तुम्हालाही याचा बळी पडू नये असे वाटत असेल, तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

दैनिक गोमन्तक

सध्याच्या युगात डिजिटल व्यवहारांना अधिक प्रोत्साहन दिले जात आहे. एकीकडे ही पद्धत वेळ वाचवते, तर दुसरीकडे संसर्ग पसरण्याच्या धोक्यापासूनही आपले संरक्षण करते. ऑनलाइन व्यवहार करणे सोयीचे असेल, पण ते धोकादायक ही आहे. वाढत्या ऑनलाइन व्यवहारांसोबतच ऑनलाइन हॅकर्सचीही संख्या वाढत आहे. अलीकडे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये ऑनलाइन फसवणूक करून लोकांचे पैसे हडप करण्यात आले आहेत. त्यामुळे ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी तुम्हालाही खूप काळजी घ्यावी लागेल.

तुम्हाला माहिती असेल की, गेल्या काही महिन्यांत पेटीएम स्पूफ अॅपचा वापर करून फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या अॅपचा इंटरफेस मूळ पेटीएम अॅपसारखाच आहे. याचा वापर करून अनेकदा लोकांची सहज फसवणूक करतात.

फसवणुकीचा (Fraud) हा प्रकार कसा केला जातो, याची तुम्हाला माहिती असावी. जेणेकरुन तुम्ही कधी त्याचा बळी ठरू नये. पेटीएम फसवणुकीशी संबंधित बहुतेक प्रकरणांमध्ये, दुकानातून काहीतरी खरेदी करतात. यानंतर, पेमेंट करताना, पेटीएम स्पूफ वापरून बनावट पेमेंट तयार केले जाते. हे करण्यासाठी ग्राहक (Customer) म्हणून आलेले खरेदीदार दुकानाचे नाव, दुकानदाराचा फोन नंबर आणि इतर माहिती विचारतात. सर्व माहिती एंटर केल्यानंतर, हे लोक त्यांना बनावट पेमेंट दाखवतात, जे हुबेहुब दिसते. या पेटीएम (Paytm) स्पूफद्वारे दुकानदाराच्या खात्यावर पैसे भरण्याची खोटी पावती दिसते, परंतु प्रत्यक्षात पैसे बँक खात्यात जमा होत नाहीत.

असे घोटाळे कसे टाळायचे

तुम्हालाही याचा बळी पडू नये असे वाटत असेल, तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. कोणाकडूनही ऑनलाइन पैसे घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम नेहमी तपासावी.

यासोबतच तुम्ही क्रेडिटचा स्रोतही पडताळला पाहिजे. त्याच वेळी, पेमेंट क्रेडिटचा मेसेज तुमच्या बँकेकडून (bank) आला आहे का याची खात्री करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT