डिजिटल पेमेंट्स (Digital Payments) आणि वित्तीय सेवा कंपनी Paytm ने आपल्या IPO विक्रीपूर्वीच अँकर गुंतवणूकदारांकडून 8,235 कोटी रुपये उभे केले आहेत . पेटीएमने शेअर बाजाराला (Share Market) पाठवलेल्या माहितीत म्हटले आहे की, त्यांनी ब्लॅकरॉक, सीपीपी इन्व्हेस्टमेंट बोर्ड (सीपीपीआयबी), बिर्ला एमएफ आणि अँकर गुंतवणूकदार फेरीत इतर गुंतवणूकदारांकडून कंपनीसाठी निधी उभारला आहे.(Paytm rises 8,235 from investors before Paytm IPO)
Paytm मध्ये ब्लैकरॉक ने 1,045 कोटी, कॅनडा पेन्शन स्कीम इन्व्हेस्टमेंट बोर्डने रु. 938 कोटी आणि GIC ने रु. 533 कोटी रुपये गुंतवले आहेत गुंतवले आहेत.कंपनीचा IPO 8 नोव्हेंबर रोजी येणार असून इक्विटीसाठी शेअरची किंमत 2,080-2,150 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे.
डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म कंपनी पेटीएमने सांगितले आहे की कंपनी आता 18300 कोटी रुपयांचा IPO आणणार आहे. यापूर्वी बाजार नियामक सेबीने 16600 कोटींचा IPO मंजूर केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीची सर्वात मोठी शेअरहोल्डर अलीबाबा ग्रुप फर्म अँट फायनान्शियल्स आणि सॉफ्टबँकसह इतर विद्यमान गुंतवणूकदारांनी पेटीएममधील त्यांचे बहुसंख्य हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे.
बाजारात सूचिबद्ध झाल्यामुळे, Paytm भारतातील सर्वोच्च 50 सर्वोच्च कंपन्यांच्या यादीत समाविष्ट होईल. 2150 या किमतीनुसार कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1.39 लाख कोटी रुपये असेल. या मूल्यांकनावर आधारित, ती देशातील 36 वी सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी असेल.याआधी, कंपनीची योजना IPO द्वारे एकूण रु. 16,600 कोटी उभारण्याची होती, ज्यामध्ये रु. 8,300 कोटींचा नवीन इश्यू आणि रु. 8,300 कोटींचा ओपन फॉर सेलचा समावेश होता. विद्यमान शेअरधारकांनी अधिक हिस्सा विकण्याच्या निर्णयामुळे OFS चा आकार रु. 1,700 कोटींनी वाढून रु. 10,000 कोटी रुपये होईल.
Paytm IPO 8 नोव्हेंबरला उघडणार आहे.कंपनीचा आयपीओ 10 नोव्हेंबर रोजी बंद होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , कंपनीने याबाबत सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत. हे किंमत श्रेणीसह 'अपडेट' केले जातील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.