Amit Tyagi
Amit Tyagi Dainik Gomantak
अर्थविश्व

Pay World: डिजिटल सुविधांमध्ये ग्रामीण भारत अजून सक्षम होणार, ही कंपनी करतेय भरीव काम

Pramod Yadav

Pay World: देशातील अनेक दुर्गम भागात अजूनही सामान्य बँकिंग आणि एटीएम सेवा उपलब्ध नाहीत. ग्रामीण भारतातील बँकिंग सुविधांवर पे वर्ल्ड कंपनी सध्या काम करत आहे. पे वर्ल्डचे सीईओ अमित त्यागी देशातील सुमारे 10 लाख रिटेल आउटलेटसह काम करत आहेत. पे वर्ल्ड कंपनीने ज्या भागात अद्याप बँकिंग, वित्त आणि विमा या सुविधा पोहोचलेल्या नाहीत अशा भागात या सेवा पोहोचविण्याचे काम करत आहे.

ग्रामीण भागातील लोकांना बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी वन स्टॉप शॉप, विमा पॉलिसी खरेदी करण्याची सुविधा, लहान-मोठी कर्जे देणे यासारखी काम करून जग देशातील करोडो लोकांना बँकिंग सुविधा देत आहोत. असे पे वर्ल्डचे सीईओ अमित त्यागी (Amit Tyagi) म्हणाले.

पे वर्ल्ड ग्रामीण भागातील किरकोळ विक्रेत्यामार्फत ग्रामीण भागातील लोकांना रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा देखील देते. रिटेलरकडून ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंगची सुविधाही दिली जाऊ शकते. ग्रामीण भागातील ग्राहक मोबाइल, लॅपटॉप, कपडे, शूज, मेक-अप आणि इतर अनेक गोष्टी Payworld रिटेलरद्वारे ऑनलाइन विकत घेऊ शकतात. असे त्यागी म्हणाले.

Payworld मनी ट्रान्सफर तुम्हाला भारतातील कोणत्याही IMPS आणि NEFT समर्थित बँकेत त्वरित पैसे पाठवू देते. तुम्ही देशभरातील कोणत्याही Payworld केंद्रातून सहजपणे पैसे पाठवू शकता. शहरांमध्ये काम करणारे लोक त्यांच्या नातेवाईकांना पाठवलेले पैसे त्यांच्या बँक खात्यात 10 सेकंदात जमा करू शकतात. PayWorld च्या ग्राहकांनी केलेले हे व्यवहार अत्यंत सुरक्षित सर्व्हरद्वारे केले जातात. ग्राहक कोणत्याही माध्यमातून किरकोळ विक्रेत्यांना पैसे देऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

Cancer News : फुफ्फुसाच्या कर्करोगाची गोमेकॉत साधनसुविधा

IRCTC Goa Tour Package: आयआरसीटीसीचं ‘गोवा टूर पॅकेज’! मिळेल सर्व काही बजेटमध्ये; जाणून घ्या डिटेल्स

SCROLL FOR NEXT