Indian passport new rules and fee hike 2026 Dainik Gomantak
अर्थविश्व

Passport New Rules: पासपोर्टचे नियम अन् फी बदलली, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री; परदेश प्रवासापूर्वी ही बातमी नक्की वाचा

India Passport Rules Fee Hike 2026: तुम्ही तुमच्या लहान मुलाचा नवा पासपोर्ट बनवण्याचा विचार करत असाल किंवा स्वतःचा जुना पासपोर्ट रिन्यू करणार असाल, तर आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.

Manish Jadhav

New passport application fees 2026: तुम्ही तुमच्या लहान मुलाचा नवा पासपोर्ट बनवण्याचा विचार करत असाल किंवा स्वतःचा जुना पासपोर्ट रिन्यू करणार असाल, तर आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने 'पासपोर्ट (सुधारणा) नियम, 2026' लागू केले आहेत.

संयुक्त सचिव आणि मुख्य पासपोर्ट अधिकारी बी. एस. मुबारक यांच्या स्वाक्षरीने 15 सप्टेंबर रोजी अधिकृत गॅझेटमध्ये ही अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, हे नवे नियम तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले. या नव्या सुधारणांनुसार सर्व प्रकारच्या पासपोर्टच्या शुल्कात मोठी वाढ करण्यात आली असून, 15 वर्षांपेक्षा लहान मुलांच्या पासपोर्टच्या वैधतेच्या अटींमध्येही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

नवीन नियमांनुसार, 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी जारी केला जाणारा 36 पानांचा सामान्य पासपोर्ट आता त्याच्या जारी तारखेपासून केवळ 5 वर्षांसाठी किंवा मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंतच वैध असेल; या दोन्हीपैकी जी अट आधी पूर्ण होईल ती लागू मानली जाईल.

याशिवाय 8 वर्षांखालील लहान मुले आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना नवीन (फ्रेश) पासपोर्ट काढताना 10 टक्के सवलत दिली जाणार आहे. मात्र, ही 10 टक्के सवलत पासपोर्ट रिन्यू किंवा पुन्हा जारी करताना मिळणार नाही, याची नोंद अर्जदारांनी घेणे आवश्यक आहे.

शुल्कातील वाढीबद्दल बोलायचे झाल्यास, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. प्रौढांसाठी 36 पानांच्या सामान्य पासपोर्टची फी 1500 रुपयांवरुन 2500 रुपये करण्यात आली, तर 60 पानांच्या सामान्य पासपोर्टसाठी 2000 रुपयांऐवजी आता 3500 रुपये मोजावे लागतील.

तात्काळ पासपोर्टच्या दरातही मोठी वाढ झाली असून, 36 पानांच्या तात्काळ पासपोर्टसाठी (Passport) 3500 रुपयांऐवजी 5000 रुपये आणि 60 पानांच्या तत्काळ पासपोर्टसाठी 4000 रुपयांऐवजी 6000 रुपये फी आकारली जाईल. जर 60 पानांचा पासपोर्ट हरवला किंवा खराब झाला, तर त्याच्या तत्काळ पुनर्रचनेसाठी (रिप्लेसमेंट) आता 5500 ऐवजी थेट 8500 रुपये मोजावे लागणार आहेत.

लहान मुलांच्या 36 पानांच्या सामान्य फ्रेश किंवा रिन्यू पासपोर्टची फी 1000 रुपयांवरुन 1750 रुपये करण्यात आली, तर त्यांच्या 36 पानांच्या तात्काळ पासपोर्टसाठी आता 3000 रुपये मोजावे लागतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास, शिक्षण किंवा रोजगारासाठी परदेशात जाणाऱ्या नागरिकांचे बजेट कोलमडणार असून देशभरात या शुल्कवाढीची जोरदार चर्चा सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT