Passport Issue: पोर्तुगीज पासपोर्टप्रश्‍नी मुख्यमंत्री आज गृहमंत्री शहा यांना भेटणार

Passport Issue: पोर्तुगालमध्ये जन्माची नोंद केल्यामुळे भारतीय पासपोर्ट मागे न घेता तो जमा करून घेतल्याचे प्रमाणपत्र दिले जावे, ही मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार आहेत.
Passport Issue
Passport IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Passport Issue:

पोर्तुगालमध्ये जन्माची नोंद केल्यामुळे भारतीय पासपोर्ट मागे न घेता तो जमा करून घेतल्याचे प्रमाणपत्र दिले जावे, ही मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार आहेत. मुख्यमंत्री सावंत आणि पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा हे उद्या (शनिवारी) दिल्लीत शहा यांची भेट घेणार आहेत.

पोर्तुगालमध्ये जन्माची नोंद केल्यामुळे नूतनीकरणावेळी भारतीय पासपोर्ट मागे घेतले जाण्याच्या घटना अलीकडे घडू लागल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने तसा निर्णय घेतला आहे. असा पासपोर्ट मागेघेतल्यामुळे या गोमंतकीयांना अनिवासी भारतीय ओळखपत्रासाठी अर्ज करता येत नाही की, त्यांना पोर्तुगीज पासपोर्टही घेता येत नाही.

त्यांचा पासपोर्ट मागे घेतला गेल्याने त्यांच्या मुलांना विदेशातून भारतात येण्यासाठी व्हिसा मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे. पोर्तुगालमध्ये जन्म नोंद केलेल्या गोमंतकीयांच्या मुलांना भारतीय पासपोर्टही देणे नाकारले जात आहे.

Passport Issue
Goa Politics: कायदा-सुव्यवस्था ढासळली; युरी आलेमाव

अशा समस्यांनी ग्रस्त गोमंतकीयांसोबत आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात संवाद साधला. त्या बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री शहा यांच्यासोबत उद्या होणाऱ्या बैठकीत हा विषय उपस्थित करू, असे आश्वासन दिले.

आचारसंहितेपूर्वी प्रश्‍न मार्गी लावा!

या बैठकीत सहभागी झालेल्या गोमंतकीयांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारने यावर तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. भारतीय पासपोर्ट दाखल करून घेतल्याचे प्रमाणपत्र दिल्यास निम्म्या समस्याग्रस्तांचा प्रश्न सुटू शकतो. केवळ जन्माची नोंद पोर्तुगालमध्ये केली म्हणून ती व्यक्ती पोर्तुगीज नागरिक ठरत नाही, असे गृहमंत्र्यांनी ठरविले तर हा प्रश्न पूर्णत: सुटू शकतो, याकडे मुख्यमंत्र्यांचे या बैठकीत लक्ष वेधण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Nepal Border Arrest
goa archives department digitization
India Passport
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com