Farmers Dainik Gomantak
अर्थविश्व

शेतकऱ्यांना मोठी भेट! Modi Govt देतेय संपूर्ण 3 लाखांचा लाभ, जाणून घ्या सविस्तर

Pashu Kisan Credit Card: शेतकऱ्यांसाठी (PM Kisan Scheme) एक आनंदाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

Pashu Kisan Credit Card: शेतकऱ्यांसाठी (PM Kisan Scheme) एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही शेतकरी असाल आणि पशुपालन व्यवसाय करत असाल तर आता तुम्हाला केंद्र सरकारकडून पूर्ण 3 लाख रुपयांचा लाभ मिळेल. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत असून त्याअंतर्गत तुम्हाला आर्थिक मदतही दिली जात आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल आम्ही सांगणार आहोत-

योजना काय आहे?

पीएम किसान सन्मान निधी आणि किसान क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून (Government) क्रेडिट कार्डची सुविधा दिली जातेय. या कार्डचे नाव पशु किसान क्रेडिट कार्ड आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला 3 लाख रुपयांचा लाभ मिळेल.

पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी सुविधा दिली जात आहे

गाय, म्हैस, पशुपालन, मत्स्यपालन यासारख्या कामात गुंतलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरकारकडून हे कार्ड दिले जात आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारला (Central Government) पशुसंवर्धनाला चालना द्यायची आहे, जेणेकरुन देशभरातील दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि मांस यांची कमतरता भरुन काढता येईल.

यापूर्वी कर्जासाठी बँकेत जावे लागत होते

पूर्वी पशुपालकांना बँकेकडून (Bank) कर्ज घेण्यासाठी अर्ज करावा लागत होता, परंतु आतापासून त्यांना पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत आवश्यकतेनुसार कर्ज सहज मिळते. याशिवाय मोदी सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांचा लाभ देत आहे.

पीएम किसानशी जोडले गेले

केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला होता, त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड पशुपालन आणि मत्स्यपालनाशी जोडले गेले होते. म्हणजेच, पीएम किसानचा लाभ घेणारे शेतकरीही या कार्डची सुविधा घेऊ शकतात.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल- (Pashu Kisan Credit Card Documents))

  • 1. शेतकऱ्याचे आधार कार्ड

  • 2. पॅन कार्ड

  • 3. शेतकऱ्यांच्या जमिनीचा तपशील (खसरा खतौनीची प्रत इ.)

  • 4. पासपोर्ट आकाराचा फोटो

शासनाकडून अनुदान मिळते

सध्या पशुपालकांना क्रेडिट कार्डद्वारे कमाल 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. या क्षेत्रासाठी ही कमाल कर्ज मर्यादा आहे. या कर्जावर बँकेकडून 7 टक्के दराने व्याज आकारले जाते, मात्र केंद्र आणि राज्य सरकारे त्यावर अनुदानही देते. कोणत्याही शेतकऱ्याला यावर अनुदान घ्यायचे असेल तर त्याला एक वर्षाच्या मुदतीत कर्जाची परतफेड करावी लागेल.

मला हे कार्ड कुठून मिळेल?

तुमच्या घराजवळील कोणत्याही CSC केंद्रावर जाऊन तुम्ही हे कार्ड बनवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

ज्ञानेश कुमारांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाची प्रतिमा काळवंडली, विरोधकांवर उलटणार डाव; मोदी सरकार करणार 'खेला'

संपादकीय: ‘ते’ आले अन् गेले!

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

SCROLL FOR NEXT