EPFO
EPFO  Dainik Gomantak
अर्थविश्व

EPFO च्या ग्राहकांची वाढणार पेन्शन! Pension वाढीच्या प्रस्तावावर सरकारचे मोठे वक्तव्य

दैनिक गोमन्तक

EPFO News: EPFO सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारने फेटाळला आहे. यानंतर, विद्यमान 1,000 रुपये प्रति महिना पेन्शन वाढवण्याचा कामगार मंत्रालयाचा प्रस्ताव नाकारण्यासाठी संसदीय समिती अर्थ मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागणार आहे. मात्र, कामगार मंत्रालयाने प्रस्तावित केलेल्या वाढीची रक्कम माहीत नाही.

ईपीएफओ सदस्यांना धक्का

मिळालेल्या माहितीनुसार, कामगार मंत्रालय आणि EPFO ​​च्या उच्च अधिकार्‍यांनी गुरुवारी बीजेडी खासदार भर्त्रीहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालील कामगार विषयक संसदीय स्थायी समितीला EPF पेन्शन योजना आणि त्याच्या निधीच्या व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.

अधिका-यांनी समितीला माहिती दिली की, मासिक पेन्शनमध्ये (Pension) कोणत्याही वाढीचा कामगार मंत्रालयाचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाने मान्य केला नाही. यानंतर समितीने आता अर्थ मंत्रालयाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बोलावून या विषयावर स्पष्टीकरण मागवण्याचा निर्णय घेतला आहे.

खरेतर, समितीने आपल्या अहवालात सदस्य/विधवा/विधुर पेन्शनधारकांना देय असलेली मासिक पेन्शन किमान 2,000 रुपयांनी वाढवण्याची शिफारस केली होती. वाढती महागाई (Inflation) लक्षात घेऊन समितीने हा प्रस्ताव दिला होता.

पेन्शन योजनेत बदल

विशेष म्हणजे, EPFO ​​ने कर्मचारी पेन्शन योजना 1995 (EPS-95) अंतर्गत सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ठेवी काढण्यास सहमती दर्शवली आहे. आत्तापर्यंत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) सदस्यांना सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा शिल्लक असेल तरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातून ठेवी काढण्याची परवानगी आहे. या निर्णयाचा अर्थ असा आहे की, आता EPFO ​​चे सदस्य पेन्शन फंडातूनही पैसे काढू शकतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

SCROLL FOR NEXT