Budget Session 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget Session 2022: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर

सकाळी 11 वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडला जाणार अर्थसंकल्प

दैनिक गोमन्तक

2022 या वर्षातील संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 31 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता संसदेचे अधिवेशन सुरू होणार असून 8 एप्रिल पर्यंत चालणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे अधिवेशन दोन टप्प्यात होत असते.

यातील पहिल्या टप्प्यातील अधिवेशन हे 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत चालणार असून दुसरा टप्पा हा 14 मार्च ला सूरु होईल. तर ते 8 एप्रिल संपणार आहे. अधिवेशनाच्या (Convention) सुरूवातीला राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल. तर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्प (Budget) मांडला जाणार आहे.

तत्पुर्वी सोमवारी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu)आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla)यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. आणि सद्य परिस्थितीत मागील हिवाळी अधिवेशनातील कोविड प्रोटोकॉलचा आढावा घेण्याचे आणि या संदर्भात लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

अर्थसंकल्पीय अधिवेशन मे महिन्यापर्यंत दोन टप्प्यांत चालते. राष्ट्रपतींचे (President) अभिभाषण आणि अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प यावर संसदेत चर्चा केली जाते आणि त्यानंतर सर्व पक्षांच्या मदतीने ते पारित करूण राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठविले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT