Pan Card Dainik Gomantak
अर्थविश्व

Pan Card: सरकारची मोठी घोषणा, पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत वाढवली!

Pan Card Aadhaar Card Linking: तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करणे हे एक महत्त्वाचे काम आहे, जे प्रत्येक भारतीय नागरिकाने पूर्ण करणे आवश्यक आहे.

Manish Jadhav

Pan Card Aadhaar Card Linking: तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करणे हे एक महत्त्वाचे काम आहे, जे प्रत्येक भारतीय नागरिकाने पूर्ण करणे आवश्यक आहे.

आता, पॅन कार्ड (Pan Card) आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख सरकारने वाढवली आहे. देशातील नागरिक आता 30 जून 2023 पर्यंत आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करु शकतात.

आत्तापर्यंत, पॅनशी आधार लिंक करण्याची तारीख 31 मार्च 2023 होती, मात्र आता ती 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) मार्फत पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख यापूर्वी अनेकदा वाढवण्यात आली आहे.

तसेच, आयकर विभागाने सातत्याने पॅनला आधार कार्डशी (Aadhar Card) लिंक करण्याबाबत पाठपुरावाही केला. IT कायदा, 1961 नुसार, सर्व पॅन धारकांना, जे सूट मिळालेल्या श्रेणीत येत नाहीत, त्यांनी त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे, अन्यथा लिंक न केलेला पॅन निष्क्रिय होईल.

त्याचबरोबर, आधारशी पॅन लिंक करणे 31 मार्च 2022 पूर्वी मोफत होते आणि त्यानंतर 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 दरम्यान ते 500 रुपये होते.

आता 31 मार्च 2023 पर्यंत 1000 रुपये दंड भरुन आधार पॅन लिंक करता येणार असले तरी आता ही तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढली आहे.

तुम्ही असे करण्यात अयशस्वी झाल्यास, तुमचे पॅन निष्क्रिय होईल. पॅनशी आधार लिंक करण्याची प्रक्रिया एकदम साधी आहे, जी तुम्ही तुमच्या घरी बसून ऑनलाइन करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'शार्क टँक'ची Namita Thapar गोव्यात! ''12 तासांच्या शूटिंगमधून सुटका'' म्हणत शेअर केले फोटोज; व्हेकेशन लूक होतोय Viral

Goa voters missing: गोव्यातील एक लाख 78 हजार मतदार गहाळ; 10 लाख 84 हजार 956 मतदारांची नोंद

Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

रडून – रडून 5 किलो वजन घटले, बायको जिवंत मुडद्यासारखी झालीय; गोव्यातल्या 'त्या' नाईट कल्ब डान्सरचा पती भावूक

शूटिंगनंतर कुठे गायब झालाय अक्षय खन्ना? 167 कोटींची मालमत्ता असलेला 'रहमान' राहतोय अलिबागमध्ये; स्वर्गाहून सुंदर फार्महाऊस!

SCROLL FOR NEXT