Twitter Dainik Gomantak
अर्थविश्व

ट्विटरची मोठी कारवाई, 46000 हून अधिक भारतीय अकाउंटवर घातली बंदी

ट्विटरने भारतातील हजारो ट्वीटर अकाउंटवर बंदी घातली आहे.

दैनिक गोमन्तक

Twitter Accounts Banned: ट्विटरने भारतातील हजारो ट्वीटर अकाउंटवर बंदी घातली आहे. ट्विटरने मासिक अनुपालन अहवालात यासंबंधीची माहिती दिली आहे. निवेदनानुसार, मे 2022 मध्ये 46,000 हून अधिक भारतीय ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्यात आली होती. (Over 46000 Indian Twitter Accounts Banned Know What You Should Avoid Posting)

अहवालानुसार, ट्विटरने (Twitter) आपल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे ही अकाउंट बंद केली आहेत. या आकडेवारीवरुन असे दिसून आले आहे की, ट्विटरने लहान मुलांचे लैंगिक शोषण, तत्सम सामग्रीचा अप्रचार रोखण्यासाठी सुमारे 43,656 अकाउंटवर बंदी घातली आहे. तर उर्वरित 2,870 भारतीय यूजर्सच्या ट्विटर अकाउंटवरुन दहशतवादाला (Terrorism) प्रोत्साहन दिल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे, तुमच्यावर अशीच बंदी घातली जाणार नाही याची खात्री करण्यासाठी, अशी कोणतीही सामग्री कधीही पोस्ट करु नका.

ट्विटरने आपल्या अहवालात म्हटले आहे की, "आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर व्यक्त होण्यासाठी प्रत्येकाचे स्वागत करतो. परंतु धमक्या देणाऱ्यांना आम्ही सहन करणार नाही."

तक्रारींमुळे भारतात ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे

ट्विटरने म्हटले आहे की, 26 एप्रिल ते 25 मे 2022 या कालावधीत ट्विटरच्या स्थानिक तक्रार यंत्रणेद्वारे भारतात सुमारे 1,698 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ऑनलाइन गैरवर्तन किंवा छळ, द्वेषपूर्ण प्रचार, चुकीची माहितीचा प्रचार-प्रसार, तोतयागिरी, ऑनलाइन छळवणुकीशी संबंधित नियमांचे उल्लंघन, ही कारणे Twitter ने आकाऊंट बंद करण्यासंबंधी सांगितली. इंडिया ग्रीव्हन्स चॅनेलद्वारे प्राप्त झालेल्या प्रत्येक यूजर्सच्या तक्रारीचे मूल्यमापन Twitter च्या सेवा अटी आणि नियमांनुसार सूचित करण्यात आले आहे की, कोणतीही सामग्री मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत आहे का हे तपासून पाहिले जाईल.

दुसरीकडे, केवळ ट्विटरच नाही तर, मे महिन्यात, Google ने देखील बाल लैंगिक शोषण आणि हिंसक अतिरेकी सामग्रीसह हानिकारक सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी 393,303 अकाउंट बंद केली. काही दिवसांपूर्वी, तुमच्या दैनिक इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने मे महिन्यात 19 लाखांहून अधिक भारतीय वापरकर्त्यांच्या खात्यांवर बंदी घातली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT