OnePlus decided to give a lifetime warranty with the phone's display. Dainik Gomantak
अर्थविश्व

OnePlus च्या निर्णयाने ग्राहक खुश, फोनच्या डिस्प्लेसह आता लाइफटाइम वॉरंटी

Green Line: वनप्लसने भारतीय यूजर्ससाठी ही घोषणा केली आहे. याशिवाय फोन अपग्रेड केल्यास सूटही जाहीर करण्यात आली आहे.

Ashutosh Masgaunde

OnePlus decided to give a lifetime warranty with the phone's display:

वर्षानुवर्षे अनेक यूजर्स त्यांच्या फोन स्क्रीनवर ग्रीन लाइट उमटत असल्याची तक्रार करत होते. ही समस्या मुख्यतः OnePlus च्या AMOLED डिस्प्ले फोनमध्ये दिसून येते.

गेल्या काही महिन्यांत, अनेकांनी OnePlus फोनच्या ग्रीन लाइनबद्दल तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींनंतर वनप्लसने डिस्प्लेला लाइफटाईम वॉरंटी जाहीर केली आहे.

वनप्लसने भारतीय यूजर्ससाठी ही घोषणा केली आहे. याशिवाय फोन अपग्रेड केल्यास सूटही जाहीर करण्यात आली आहे.

वनप्लसच्या प्रवक्त्याने टेक वेबसाइट अँड्रॉइड अथॉरिटीला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, ग्रीन लाइन डिस्प्लेसह भारतातील सर्व वनप्लस फोनला आता लाइफटाईम वॉरंटी दिली जाईल.

ही वॉरंटी फक्त डिस्प्लेसाठी आहे संपूर्ण स्मार्टफोनसाठी नाही. असेही वनप्लसच्या प्रवक्त्याने यावेळी सांगितले.

अपग्रेड ऑफर

OnePlus ने ग्रीन लाइटचा प्रॉब्लेम असणाऱ्या ग्राहकांसाठी अपग्रेड ऑफर देखील जाहीर केली आहे. ज्यांच्या डिस्प्लेवर ग्रीन लाइट्सचा प्रॉब्लेम हिरव्या रेषा दर्शवत आहे त्यांना त्यांचा फेन अपग्रेड करता येणार आहे.

वनप्लसच्या अनेक सर्व्हिस सेंटर्सवर यासंबंधीच्या नोटिसाही पाठवण्यात आल्या आहेत. जर तुमच्याकडे OnePlus 8 Pro, 8T, 9 किंवा 9R असेल आणि त्याला ग्रीन लाईनचा प्रॉब्लेम असेल तर, तर तुम्ही नवीन OnePlus फोन सवलतीच्या दरात खरेदी करू शकता.

ग्रीन लाइन म्हणजे काय?

अनेक वनप्लस यूजर्सनी तक्रार केली आहे की, त्यांच्या फोनच्या डिस्प्लेवर अचानक ग्रीन लाइन येते. अनेकदा ही लाइन कोणत्याही कारणाशिवाय येते आणि जात नाही. अनेक यूजर्सनी फोनच्या डिस्प्लेची दुरुस्ती केली आहे परंतु त्यानंतरही समस्या कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गो टू युवर कंट्री", मध्यरात्री गोवा पोलिसांनी गाडी थांबवली, पुरुष अधिकाऱ्याने केली शिवीगाळ; डीजे क्रिस्पी क्रिस्टिनाचा Video Viral

Yadava Dynasty Battle: चित्रप्रभू चालून गेला, अल्लाउद्दिनचे पुत्र ठार झाले! तुर्की सैन्यात एकच बोंबाबोंब झाली; खिलजीची देवगिरीवर स्वारी

'गोव्याची प्रतिमा धोक्यात येतेय!', 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमाचे आयोजन; महिला मंचाचा कडक आक्षेप

Goa Live News: गोवा पोलिसांकडून विवादास्पद कार्यक्रम रद्द! 'कामासूत्र आणि ख्रिसमस' कार्यक्रमाच्या आयोजकांना निर्देश

Komanda Kurumba Prabhu: महाप्रलयानंतर देश एक विशाल अरण्य होता, जिथे जंगली प्राणी होते, मानववंश उदयास आला; संघटित, सभ्य 'कुरुंब'

SCROLL FOR NEXT