OnePlus 10T Twitter/OnePlus
अर्थविश्व

OnePlus 10T 3 ऑगस्टला होणार भारतात लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

दैनिक गोमन्तक

OnePlus 3 ऑगस्ट रोजी भारतात OnePlus 10T लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा तोच फोन आहे, जो काही तासांपूर्वी चीनमध्ये त्याच दिवशी OnePlus Ace Pro म्हणून लाँच केला जाईल. OnePlus ने पुष्टी केली आहे की OnePlus Ace Pro 16GB LPDDR5 RAM सह मार्केटमध्ये येणार आहे.

OnePlus ने पुष्टी केली आहे की OnePlus Ace Pro 16GB पर्यंत LPDDR5 RAM सह येईल, जे मागील पिढीच्या OnePlus स्मार्टफोन्सपेक्षा जास्त आहे. दरम्यान, टिपस्टर मुकुल शर्माने एका ट्विटद्वारे चीनमधील आगामी OnePlus Ace Pro आणि भारतात OnePlus 10T 5G च्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली आहे.

एका ऑनलाइन अहवालानुसार, OnePlus 10T भारतात लॉन्च होण्याच्या वेळी 8GB + 128GB आणि 12GB + 256GB अशा दोन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल. लॉन्चच्या आधी OnePlus द्वारे फोनच्या बऱ्याच हार्डवेअरची पुष्टी केली गेली आहे. आगामी OnePlus Ace Pro स्मार्टफोन 16GB RAM सह मार्केटमध्ये येणार. स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले असेल. फोनला Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर मिळेल. फोन Android 12 वर चालेल.

ट्रिपल रिअर कॅमेरा

OnePlus 10T ला ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. यात 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा मागचा कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा सेन्सर असू असणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी OnePlus Ace Pro मध्ये 16-मेगापिक्सेल कॅमेरा येणार अशी चर्चा आहे.

2330mAh ड्युअल-सेल बॅटरी

0nePlus 10T दोन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये 2330mAh ड्युअल-सेल बॅटरी असेल. ज्यामध्ये 4660mAh बॅटरी युनिट असण्याची अपेक्षा आहे. टिपस्टरनुसार, हँडसेटची परिमाणे 163×75.4×8.75mm आहे आणि त्याचे वजन 203.5 ग्रॅम आहे. कंपनी हा फोन 3 ऑगस्टला लॉन्च करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT