Old Pension Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

Old Pension Scheme: 'या' महिन्यात लागू होणार जुनी पेन्शन योजना; रद्द होणार नवी पेन्शन...!

Old Pension News: जुनी पेन्शन योजना लागू करण्याची देशभरात चर्चा आहे. दरम्यान, जुन्या पेन्शन पद्धतीबाबत मोठी बातमी समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

Old Pension News: जुनी पेन्शन योजना लागू करण्याची देशभरात चर्चा आहे. दरम्यान, जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली जात आहे. त्याचबरोबर आजही अनेक राज्यांमध्ये नवी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन व्यवस्था पूर्ववत सुरु करण्याची मागणी होत आहे.

पहिल्या कॅबिनेटमध्ये OPS लागू करण्यात येणार

हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू म्हणाले की, या महिन्यात आमचे मंत्रिमंडळ (Cabinet) तयार होईल आणि त्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करु, ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल.

लवकरच विस्तार होईल

मंत्रिमंडळाचा विचार करुन त्यांनी आपला निर्णय सर्वांसमोर मांडला असून, लवकरच विस्तार होणार आहे. त्याची यादी येताच त्याची अंमलबजावणी केली जाईल.

अनेक राज्यांमध्येही लागू केले जाईल

2022 च्या अर्थसंकल्पात राजस्थान (Rajasthan) सरकारने पुढील आर्थिक वर्षात जुनी पेन्शन पुन्हा सुरु करण्याची घोषणा केली होती. यासोबतच राज्य सरकार छत्तीसगडमध्येही त्याची अंमलबजावणी करणार आहे. 2004 मध्ये केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना रद्द करुन त्याऐवजी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली सुरु केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT