Old Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, जुनी पेन्शन योजना होणार लागू; सरकारने सांगितला प्लॅन!

Old Pension Scheme Latest News: अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरत आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Old Pension Scheme Latest News: अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. अलीकडेच अनेक राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर जुन्या पेन्शन योजनेबाबत चर्चा सुरु झाली आहे.

जुन्या पेन्शन योजनेची मागणी

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होत आहे. काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात जुनी पेन्शन योजना हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाबमध्ये सरकार पुन्हा एकदा जुन्या पेन्शन योजनेकडे वळत आहे.

PM Narendra Modi
Old Pension Scheme: जुन्या पेन्शनवर भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य, काँग्रेस सरकारचं कौतुक; का माहित आहे?

OPS चा लाभ कोणाला मिळणार?

जुन्या पेन्शन योजनेबाबत केंद्र सरकारकडून कोणतेही ठोस उत्तर दिले जात नाही. दुसरीकडे मात्र, विरोधकांनी निवडणुकीत हा मुद्दा रोखून धरला असून, त्याचा परिणाम आगामी काळातही दिसून येऊ शकतो.

PM Narendra Modi
Old Pension Scheme वर भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य, 'भूताला जागे करु नका, नाहीतर...'

'श्रीलंकेची 2034 सारखी परिस्थिती असेल'

यापूर्वी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भगवंत कराड आणि भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनीही जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठे वक्तव्य केले होते. आज जी राज्ये जुनी पेन्शन जाहीर करत आहेत, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, पण 2034 मध्ये त्यांची अवस्था श्रीलंकेसारखी (Sri Lanka) होईल, असे सुशील मोदी म्हणाले होते. जुनी पेन्शन लागू करुन भावी पिढीवर बोजा टाकणे हा 'मोठा गुन्हा' ठरेल, असेही ते म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com