OLA plan to collect 7000 crore investment before launch companies IPO Dainik Gomantak
अर्थविश्व

'ओला' कंपनी IPO पूर्वीच उभारणार 7 हजार कोटींचं भांडवल

दैनिक गोमन्तक

कॅब सेवा कंपनी (Cab Company) ओला (OLA) पुढील काही महिन्यांत इक्विटी आणि कर्जाच्या माध्यमातून 1 अब्ज डॉलर पेक्षा जास्त निधी उभारण्याचा विचार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओला पुढील वर्षी येणा-या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) च्या आधी 1 अब्ज डॉलर उभारण्याची तयारी करत आहे. त्यासाठी कंपनी इक्विटी आणि कर्ज यासारख्या पद्धतींचा अवलंब करू शकते . यामध्ये त्याचे मूल्य 7.5 अब्ज डॉलर असण्याची शक्यता आहे. ओलाने नुकतेच एडलवाइज आणि इतर स्त्रोतांकडून 1,049 कोटी रुपये भांडवल उभे केले आहे . (OLA plan to collect 7000 crore investment before launch companies IPO)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निधी उभारणीचा उपक्रम अनेक टप्प्यात केला जाईल. मात्र, ओलाने यासंदर्भात पाठवलेल्या ईमेलला प्रतिसाद दिला नाही. कंपनीने उभारलेला 139 दशलक्षचा डॉलरच्या इक्विटी निधी कंपनीच्या विस्तारासाठी वापरला जाईल. ओला जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मुदत कर्ज (TLBs) द्वारे 500 दशलक्ष डॉलर उभारण्याचा विचार करत आहे.(OLA IPO)

Ola ला अलीकडेच S&P Global कडून B-रेटिंग आणि Moody's कडून स्थिर दृष्टीकोन असलेले B3 क्रेडिट रेटिंग मिळाले आहे. Ola ने रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे दाखल केलेल्या नियामक दस्तऐवजानुसार, एडलवाईस आणि इतरांनी कंपनीत 1,049.06 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, ज्याचे मूल्य 7 अब्ज डॉलर आहे.

या फेरीत गुंतवणूक करणाऱ्या इतर गुंतवणूकदारांमध्ये अलका पीएन फॅमिली ट्रस्ट, अतुल डीपी फॅमिली ट्रस्ट, सिद्धांत पार्टनर्स, हिरो एंटरप्राइज पार्टनर व्हेंचर्स, विको लॅबोरेटरीज यांचा समावेश आहे. फाइलिंगनुसार, ओलाने एकूण 4,63,471 मालिका J1 शेअर्स प्रति शेअर 22,625 रुपये प्रीमियमने वाटप केले आहेत.ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले की कंपनी 2022 मध्ये सार्वजनिक ऑफरची योजना आखत आहे, परंतु अद्याप तारीख निश्चित केलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT