Ola Electric Upcoming Two Wheelers Dainik Gomantak
अर्थविश्व

Ola Electric Upcoming Two Wheelers: एक नाही, दोन नाही... ओला 12 इलेक्ट्रिक टू-व्हीलर करणार लॉन्च; कंपनीने आखली मोठी योजना

12 New Ola Electric Vehicles: देशात गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची धूम पाहायला मिळत आहेत. यातच आता, इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक बनवणारी कंपनी ओला इलेक्ट्रिकने एक खास योजना आखली आहे.

Manish Jadhav

Ola Electric to Launch 12 New Electric Two Wheelers Soon

देशात गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची धूम पाहायला मिळत आहेत. यातच आता, इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक बनवणारी कंपनी ओला इलेक्ट्रिकने एक खास योजना आखली आहे. ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच त्यांची नवीन इलेक्ट्रिक बाईक रोडस्टर लॉन्च केली. कंपनी आता एकामागून एक 12 नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. या शानदार टू-व्हीलर्स येत्या काही महिन्यांत लॉन्च होऊ शकतात.

ओला इलेक्ट्रिक

ओला इलेक्ट्रिक त्यांच्या वाहनांच्या पोर्टफोलिओचा सातत्याने विस्तार करत आहे. म्हणूनच, ओला एस 1 मालिकेतील स्कूटर्स व्यतिरिक्त, कंपनीने स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसह इलेक्ट्रिक बाईक्स आणि स्कूटर्स देखील लॉन्च केल्या आहेत. या क्रमाने जुलै 2025 पासून एकामागून एक 12 इलेक्ट्रिक बाईक्स लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

ओलाची स्पोर्टी स्कूटर लवकरच लॉन्च होणार

ओला आता ओला एस 1 मालिकेअंतर्गत त्यांच्या सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरचे स्पोर्टी व्हर्जन आणू शकते. यामध्ये, कंपनी आतापर्यंतची S1 मालिकेतील ज्यादा रेंज ऑफर करु शकते. गाडीवाडीच्या मते, S1 मालिकेनंतर कंपनी S2 मालिकेतील सेकंड जनरेशन स्कूटर लॉन्च करेल. ही स्कूटर सिटी आणि स्पोर्ट या दोन व्हेरिएंटमध्ये देखील येऊ शकते.

डिझाइन

खरेदीदारांना लक्षात घेऊन S2 मालिका डिझाइन केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मार्केटमध्ये ही बाईक थेट एथर रिट्झा तसेच बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब आणि होंडा अ‍ॅक्टिव्हा ई शी स्पर्धा करेल. दुसरीकडे, ओला एस 3 रेंजची नवीन स्कूटर देखील लॉन्च करु शकते. ती ग्रँड अ‍ॅडव्हेंचर आणि ग्रँड टूरर या दोन व्हेरिएंटमध्ये असू शकते. या मॅक्सी स्कूटर सेगमेंटमधील स्कूटर असू शकतात.

मोटारसायकलींसाठी नवीन पर्याय

स्कूटर व्यतिरिक्त, ओला त्यांच्या इलेक्ट्रिक मोटरसायकल पोर्टफोलिओचा विस्तार करणार आहे. सर्वप्रथम, कंपनी लवकरच त्यांच्या इलेक्ट्रिक बाईक्स रोडस्टर एक्स आणि रोडस्टर एक्स+ची डिलिव्हरी सुरु करु शकते. यानंतर, स्पोर्टस्टर ही एक नवीन मालिका देखील सादर केली जाते. तिचा लूक स्पोर्टी असणार असून ती एक परफॉर्मन्स बाईक असेल. ओलाच्या योजनांमध्ये अ‍ॅडव्हेंचर, अ‍ॅरोहेड, क्रूझर आणि डायमंडहेड सारख्या नवीन मालिकेतील बाईक्सचे अनेक व्हेरिएंट आणण्याचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT