Ola Electric Scooter launched in India Twitter/@olacab
अर्थविश्व

Ola Electric Scooter भारतात लॉंच; किंमत 99,999

ओला एस 1 प्रो या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1,29,999 रुपये अशी असणार आहे.

दैनिक गोमन्तक

15 ऑगस्ट 2021 देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिनी Ola कंपनीने आपली Electric Scooter भारतीय बाजारात नवीन स्कूटर लाँच झाली आहे. Ola समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष भाविश अग्रवाल यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली होती, त्यानुसार आज ही स्कुटर लॉंच झाली आहे. स्कुटरची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. ओला एस 1 प्रो हे ई-स्कूटरचे टॉप मॉडेल असुन या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1,29,999 रुपये अशी असणार आहे.

दोन्ही स्कुटरमध्ये लुक, परफॉर्मन्स, राइडिंग मोडची संख्या आणि रंगांच्या बाबतीत मोठा फरक आहे. एस 1 प्रो काही अतिरिक्त वैशिष्ट्यांसह बाजारात येणार आहे. ज्यामध्ये व्हॉइस कंट्रोल, हिल होल्ड आणि क्रूझ कंट्रोलचा समावेश असणार आहे. एस 1 प्रोला क्विकशिफ्टर एक्सीलेरेशन, उत्तम श्रेणी आणि वेगवान गती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी ही इलेक्ट्रिक स्कूटर डीलरशिपला नाही तर थेट प्रोडक्शन प्लांटमधून ग्राहकांना देण्याचा विचार करत आहे. सध्याची परिस्थिती पाहता किंमतींमधील फरक दूर करण्यासाठी कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरची होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेऊ शकते. विशेष गोष्ट म्हणजे या इलेक्ट्रिक स्कूटरमुळे ग्राहकांना वारंवार डीलरशिपला जावे लागणार नाही.

ओला एस 1 ची टॉप स्पीड 90 किमी/ताशी आहे. विशेष म्हणजे या स्कुटरमध्ये 2 राईडिंग मोड देण्यात आले आहेत. ज्यामध्ये एक नॉर्मल आणि स्पोर्ट, एकाच चार्जवर 121 किमीच्या रेंजसह. एस 1 प्रो बद्दल बोलायचे झाले तर, त्याची टॉप स्पीड 115 किमी/ताशी आहे. एकाच चार्जवर 181 किमी ची रेंज देते, हे तीन राइडिंग मोडमध्ये येते - नॉर्मल, स्पोर्ट्स आणि हायपर. एस 1 आणि एस 1 प्रो या दोघांना समान इलेक्ट्रिक मोटर मिळते जी 8.5 किलोवॅट आणि 58 एनएम पीक टॉर्क बनवते. S1 सोबत 2.98 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे, तर S1 Pro ला 3.97 kWh चा बॅटरी पॅक मिळणार आहे. एस 1 ला 0-40 किमी/ताशी वेग घेण्यास 3.6 सेकंद लागतात, तर एस 1 प्रो फक्त 3 सेकंदात हा वेग घेते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT