Oil prices increased for the fourth consecutive day, know how expensive petrol and diesel became today Dainik Gomantak
अर्थविश्व

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ

तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Prices) दरात रविवारी सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक

तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Prices) दरात रविवारी सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. रविवारी पुन्हा पेट्रोल (Petrol)आणि डिझेलचे (Diesel) दर वाढले. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात 25 पैशांनी वाढ केली आहे, तर पेट्रोल 20 पैशांनी प्रति लिटर महागले आहे. पुन्हा एकदा सलग चौथ्या दिवशी दिल्लीत पेट्रोल आता 102.39 रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेल 90..77 रुपयांवर पोहोचले आहे.

काल शनिवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 25 पैसे आणि डिझेलच्या दरात २० पैशांनी वाढ करण्यात आली होती. यामुळे या उत्पादनांच्या किमती सर्वकालीन उच्चांपर्यंत पोहोचल्या. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जारी केलेल्या किंमतीच्या अधिसूचनेनुसार, दिल्लीत पेट्रोलची किंमत 102.14 रुपये प्रति लीटरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली होती, स्थानिक कर आणि मालवाहतुकीवर अवलंबून देशाच्या वेगवेगळ्या भागात पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात.

यासह, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील अनेक शहरांमध्ये डिझेलची किंमत 100 रुपये प्रति लीटरची पातळी ओलांडली आहे, तर देशातील बहुतेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर पार केले आहे. तेल कंपन्यांनी स्वीकारलेल्या किंमतीच्या सूत्रानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतला जातो आणि दररोज ते बदलले जातात.

  • दिल्लीत पेट्रोलची किंमत 102.39 रुपये आहे तर डिझेलची किंमत 90.77 रुपये प्रति लीटर आहे.

  • मुंबईत पेट्रोलची किंमत 108.43 रुपये आणि डिझेलची किंमत 98.48 रुपये प्रति लीटर आहे.

  • कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 103.07 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 93.87 रुपये प्रति लीटर आहे.

  • त्याचवेळी, चेन्नईमध्ये पेट्रोल 100.01 रुपये लिटर आणि डिझेल 95.31 रुपये लिटर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: साळगाव दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर

Goa Politics: सरकार गोवेकरांचे की दिल्लीकरांचे? आमदार वीरेश यांचा सवाल, 'सडेतोड नायक'मध्ये मांडली भूमिका

WCL 2025: टीम इंडिया 2025च्या WCL मधून बाहेर, पाकिस्तानची थेट 'फायनल'मध्ये एन्ट्री

Ro-Ro Ferry In Goa: गाजावाजा करत सुरू केलेली 'रो-रो फेरीबोट' सेवा 15 दिवसांतच ठप्प होण्याच्या मार्गावर, प्रवाशांना नाहक मन:स्ताप

Goa School: पाणी पिण्‍यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार चार मिनिटांचा 'ब्रेक', शिक्षण खात्‍याकडून परिपत्रक जारी

SCROLL FOR NEXT