Odisha Train Accident Dainik Gomantak
अर्थविश्व

Odisha Train Accident: LIC कडून ओडिशा ट्रेन अपघातातील पीडितांना दिलास, घेतला 'हा' मोठा निर्णय!

भारतीय आयुर्विमा महामंडळाने ओडिशा ट्रेन दुर्घटनेतील पीडितांना दिलासा देत क्लेम सेटलमेंटची प्रोसेस सुलभ केली आहे.

Puja Bonkile

LIC Claim Settlement Process: भारतीय विमा कंपनी एलआयसीने ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील पीडितांना दिलासा दिला आहे. कारण विमा कंपनीने पीडितांच्या क्लेम सेटलमेंटची प्रोसेस अगदी सोपी केली आहे. 

शनिवारी (३ जून) ला संध्याकाळी उशिरा एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती म्हणाले की, ज्यांच्या मृत्यू झाला त्यांचा विमा उतरविला असल्यास, असे दावे तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन एलआयसीने दिले आहे. तसेच दाव्यांसाठी प्रत्येक शाखेत स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. मृत्यू प्रमाणपक्ष दिल्यास एलआयसीचे दावे तातडीने निकाली काढण्यात येणार आहे.

मोहंती म्हणाले की, बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे मी दु:खी आहे आणि एलआयसी अपघातग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे. 

ते म्हणाले की, आर्थिक दिलासा देण्यासाठी दावा निकाली काढण्याची प्रक्रिया जलद केली जाईल. भारतीय आयुर्विमा महामंडळाने LIC पॉलिसी आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या दावेदारांसाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. 

  • सवलत काय आहे

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, नोंदणीकृत मृत्यू प्रमाणपत्राऐवजी, रेल्वे, पोलिस किंवा कोणत्याही राज्य आणि केंद्र प्राधिकरणाने जारी केलेली यादी मृत्यूचा पुरावा म्हणून स्वीकारली जाईल. याचा अर्थ असा की मृत्यू प्रमाणपत्र बनवण्यासाठी तुम्हाला विभागांमध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाही. 

  • विशेष हेल्प डेस्क तयार केला

दाव्याशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि दावेदारांना सहाय्य देण्यासाठी, महामंडळाने मंडळ आणि शाखा स्तरावर एक विशेष हेल्प डेस्क तयार केला आहे आणि कॉल सेंटर नंबर (022-68276827) देखील जारी केला आहे. 

एलआयसीने निवेदनात म्हटले आहे की, दावेदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पीडित कुटुंबांचे दावे जलदगतीने निकाली काढण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. विशेष म्हणजे, ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या तीन ट्रेनच्या अपघातात 288 लोकांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

Goa Live News: देवसडा- धारबांदोडा अपघात; पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

SCROLL FOR NEXT