Oben Electric Bike Price Hike Dainik Gomatak
अर्थविश्व

Electric Bike: 'या' इलेक्ट्रिक बाईकची भारतीयांना भुरळ! कंपनीने किमतीत केली 10 हजारांची वाढ; जाणून घ्या अफलातून फिचर्स अन् रेंज

Oben Electric Bike Price Hike: ओबेन इलेक्ट्रिकने सांगितले की, त्यांनी त्यांच्या रोर ईझेड इलेक्ट्रिक बाईकच्या किमतीत वाढ केली आहे. आता ही बाईक सुमारे 10 हजार रुपयांनी महाग झाली आहे.

Manish Jadhav

Oben Electric Increases Rorr EZ Bike Price by 10000 in India

भारतात सध्या इलेक्ट्रीक बाईकची मागणी वाढली आहे. लोक मोठ्याप्रमाणात इलेक्ट्रीक बाईक खरेदी करत आहेत. याचदरम्यान आता, भारतात इलेक्ट्रिक बाईकचे उत्पादन आणि विक्री करणारी कंपनी ओबेन इलेक्ट्रिकने सांगितले की, त्यांनी त्यांच्या रोर ईझेड इलेक्ट्रिक बाईकच्या किमतीत वाढ केली आहे. आता ही बाईक सुमारे 10 हजार रुपयांनी महाग झाली आहे. तथापि, कंपनीने सांगितले की, वाढलेली किंमत फक्त इलेक्ट्रिक बाईकच्या अप्पर व्हेरिएंटवर लागू होईल. बाईकची सुरुवातीची किंमत 89, 999 रुपये एक्स-शोरुम राहील. वाढलेली किंमत 1 फेब्रुवारीपासून लागू झाली आहे. Rorr EZ ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक आहे.

Rorr EZ इलेक्ट्रिक बाईक 3 व्हेरिएंट

Rorr EZ इलेक्ट्रिक बाईक बाजारात 3 बॅटरी पॅकच्या ऑप्शनसह उपलब्ध आहे. यात 2.4 किलोवॅट प्रति तास, 3.4 किलोवॅट प्रति तास आणि 4.4 किलोवॅट प्रति तास असे ऑप्शन आहेत. 2.6 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकने सुसज्ज असलेली ही इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) एका चार्जवर 110 किमी पर्यंत धावू शकते. या बाईकला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 45 मिनिटे लागतात. 3.4 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकसह, ही बाईक 140 किमी पर्यंत धावते. चार्जिंग वेळ 1.30 तास आहे. 4.4 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकसह येणारी बाईकची टॉप मॉडेल एका चार्जवर 175 किमी धावू शकते. चार्ज होण्यासाठी 2 तास लागतात.

इलेक्ट्रिक बाईकची रेंज आणि वेग

Rorr EZ इलेक्ट्रिक बाईकच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात 7.5 किलोवॅटची मोटर आहे, जी 10 बीएचपी पॉवर जनरेट करते. ओबेनचा दावा आहे की, ही बाईक फक्त 3.3 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते. बाईकच्या टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाल्यास, तो 95 किमी आहे. बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या बाजूला मोनो शॉक अ‍ॅब्झॉर्बर्स आहेत. बाईकला 17 इंचाची चाके आहेत. खास गोष्ट म्हणजे बाईकच्या दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

इलेक्ट्रिक बाईकचे फिचर्स

Rorr EZ इलेक्ट्रिक बाईकच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला त्यात सर्वत्र एलईडी लाईट्स मिळतील. बाईकमध्ये फ्लोटिंग डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, थेफ्ट प्रोटेक्शन, युनिफाइड ब्रेक असिस्ट, ड्रायव्हर अलर्ट सिस्टम यासारखे सुरक्षा फिचर्स दिसून येतात. ओबेन त्यांच्या इलेक्ट्रिक बाईकवर 3 वर्ष किंवा 75,000 किमी वॉरंटी देखील देते. ही इलेक्ट्रिक बाईक भारतीय बाजारपेठेत Revolt RV400 BRZ ला जोरदार टक्कर देत आहे. आता ओलाची रोडस्टर एक्स देखील या बाईकला टक्कर देण्यासाठी येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT