Gold Unique Id code Dainik Gomantak
अर्थविश्व

दागिन्यांवरही येणार आता 'युनिक आयडी कोड'

जर तुमचे दागिने चोरीला गेले किंवां कुठेतरी हरवले असतील तर ते शोधण्यासाठी या युनिक कोडचा(Unique code ) वापर करून तुम्ही ते शोधू शकणार

दैनिक गोमन्तक

देशातील प्रत्येकांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे कारण देशात प्रत्येक नागरिकाजवळ थोडे फार तरी सोने(Gold) आहेच . त्याच सोन्यासाठी आता सरकार 1 जुलैपासून दागिन्यांच्या प्रत्येक तुकड्यांसाठी एक युनिक आयडेंटिफिकेशन (UID Code ) अनिवार्य करणार आहे.

म्हणजेच आता जर तुमचे दागिने चोरीला गेले किंवां कुठेतरी हरवले असतील तर ते शोधण्यासाठी या युनिक कोडचा(Unique code ) वापर करून तुम्ही ते शोधू शकणार आहात पण जर ते सोने वितळवले गेले केवळ त्याच वेळेस त्या सोन्याचा खरा मालक ओळखता येणार नाही. जसे देशातील सर्व नागरिकांना आधार कार्ड द्वारे ओळखले जाते त्याच प्रकारे आता जुलैपासून सरकार दागिन्यांच्या प्रत्येक तुकड्यांची युनिक आयडेंटिफिकेशन (यूआयडी) असणार आहे.

या यूआयडीमध्ये, विक्रेत्याचा कोड आणि दागिन्यांची ओळख नोंदविली जाणार असून बीआयएसने बनविलेल्या मोबाईल अ‍ॅपमध्ये पोलिस किंवा कोणतीही व्यक्ती या यूआयडीमध्ये प्रवेश करताच हे दागिने कधी आणि कोठून खरेदी केले गेले हे समजेल. या यूआयडीचे दागिने त्याने ज्या कोणाकडे विकले त्याविषयीही माहिती ज्वेलरकडे असणार आहे.

त्याचबरोबर आता दागिन्यांमध्ये एकूण चारपैकी केवळ तीनच हॉलमार्किंग असणार आहेत. त्याम्हणजे बीआयएस लोगो, शुद्धता आणि तिसरा संयुक्त सील असेल ज्यामध्ये ज्वेलर आणि ज्वेलरीचे वर्णन असणार आहे पण या अगोदर दागिन्यांमध्ये चार हॉलमार्किंग असायच्या ज्यामध्ये बीआयएस लोगो, शुद्धता, हॉल-मार्किंग सेंटर आणि ज्वेलर्सचा बार . आता या नवीन नियमांमुळे अशुद्ध आणि प्रमाणित दागिने विक्रीच्या व्यवसायालाही आळा बसणार आहे.

आता या नवीन नियमांनुसार देशातील 256 जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. या जिल्ह्यात आतापासून केवळ हॉलमार्क केलेले दागिने विकले जाऊ शकतील.आता सध्या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या जुन्या स्टॉकची हॉलमार्किंग करण्यासाठी सरकारने 1 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली असून या कालावधीत कोणत्याही व्यापाऱ्यां कोणतीही कारवाई केली जाणार नाही.मात्र दिलेल्या वेळेत या साऱ्या व्यापाऱ्यांनी जर हॉलमार्किंग नाही केले तर मात्र सरकार कारवाईचा बडगा उचलणार हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आयातशुल्काचा धक्का, भारतावर 25 टक्के कराची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, दंड देखील आकारणार

Rohan Harmalkar: जमीन हडप प्रकरण; रोहन हरमलकरची 212.85 कोटींची मालमत्ता 'ED'कडून जप्त

Goa Assembly: घरे नियमनाचे पहिले पाऊल! सरकारी जमिनींवरील 400 चौ.मी. जागेतील बांधकामे होणार नियमित, विधेयक सादर

Rashi Bhavishya 31 July 2025: व्यवसायात लाभ,खर्चावर नियंत्रण ठेवा; अनावश्यक वाद टाळा

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

SCROLL FOR NEXT