मागील काहीदिवसांपासून शेअर बाजारात मार्केट कॅप मोठया प्रमाणात वाढताना दिसत आहे.मार्केट कॅपच्या(MARKET CAP) या वाढीचा फायदा देशांतर्गत शेअर बाजारातील कंपन्यांना मिळत आहे. गेल्या आठवड्यात बाजारामध्ये झालेल्या या वाढीमुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या टॉप १० कंपन्यांपैकी 6 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 1,11,220.5 कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे . ज्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या मार्केट कॅपमध्ये सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे.
गेल्या आठवड्यात फक्त टीसीएस या एकाच कंपनीची मार्केट कॅप 30,961.06 कोटी रुपयांनी वाढली असून कंपनीची मार्केट कॅप 12,50,538.30 कोटी रुपयये इतकी झाली आहे. बीएसईच्या टॉप -10 कंपन्यांपैकी टीसीएसच्या मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक वाढ झाली असून यानंतर इन्फोसिसची मार्केट कॅप 29,807.59 कोटी रुपयांनी वाढली आहे. तर आता इन्फोसिसची मार्केट कॅप 6,70,915.93 कोटी रुपये इतकी झाली आहे.
मार्केट कॅप मध्ये बँकांचा देशातील सर्वात मोठी असणारी खाजगी बँक एचडीएफसीची एकूण मार्केट कॅप गेल्या आठवड्यात 19,838.88 कोटी रुपयांनी वाढून 8,36,426.69 कोटी रुपयांवर गेली आहे. तर देशातील सगळ्यात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केट कॅप 14,234.76 कोटी रुपयांनी वाढून 3,82,642.72 कोटी रुपये झाली आहे. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल 12,775.99 कोटी रुपयांनी वाढले आहे. आता बँकेची मार्केट कॅप 4,49,166.77 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एकूणच मागच्या आठवड्याचा विचार करता देशातील बँकिंग क्षेत्राचा मार्केट कॅप हा वाढलेला दिसत आहे.
तर दुसरीकडे देशात सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. बीएसईच्या आकडेवारीनुसार मागील आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 76,548.77 कोटी रुपयांनी घसरून 13,34,009.02 कोटी रुपयांवर आली आहे.
मात्र अजूनही मार्केट कॅपचा विचार करता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अजूनही अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्र बँक यांचा क्रमांक लागतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.