Nobel Prize Winner Dainik Gomantak
अर्थविश्व

Nobel Prize 2022: अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर, बँकिंग क्षेत्रातील या 3 तज्ज्ञांना मिळाला सन्मान

Nobel Prize In Economic Sciences: अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Nobel Prize Winner: अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नोबेल पारितोषिक सप्ताह 2022 च्या शेवटच्या दिवशी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदा बँकिंग क्षेत्राशी संबंधित तीन अर्थतज्ज्ञांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. बेन बर्नाके, डग्लस डायमंड आणि फिलिप डिविग हे तीन अर्थशास्त्रज्ञ आहेत. बँका आणि आर्थिक संकटांवरील संशोधनासाठी या तिन्ही अर्थतज्ज्ञांना हा पुरस्कार देण्यात आला.

बँकिंग क्षेत्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार

हे तिन्ही अर्थतज्ज्ञ अमेरिकेतील (America) आहेत. विशेष म्हणजे, या तिघांनीही आर्थिक मंदीच्या काळात बँकिंग क्षेत्र सुधारण्यासाठी संशोधन केले आहे.

त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले

याआधी, 7 ऑक्टोबर रोजी नोबेल शांतता पुरस्कार 2022 ची घोषणा करण्यात आली होती. या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार (Nobel Prize) तुरुंगात बंदिस्त बेलारशियन अधिकार कार्यकर्ते अ‍ॅलेस बिलियात्स्की यांना जाहीर झाला आहे. याशिवाय मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वैद्यक आणि भौतिकशास्त्रातील नोबेल कोणाला मिळाले?

त्याच वेळी, स्वीडिश अनुवंशशास्त्रज्ञ स्वांता पाबो यांना यावर्षीचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय फ्रेंच वंशाचे अ‍ॅलेन अ‍ॅस्पेक्ट, अमेरिकन जॉन क्लोजर आणि ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ अँटोन झिलिंगर यांना या शोधाबद्दल भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

रसायनशास्त्र आणि साहित्यात पारितोषिक मिळाले

यंदाचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक कॅरोलिन आर. बर्टोझी, मॉर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस यांना 'एकाच वेळी रेणूंचे विखंडन' समान भागांमध्ये करण्याची पद्धत विकसित केल्याबद्दल बुधवारी पुरस्कार देण्यात आला. याशिवाय स्वीडिश अकादमीने यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नॉक्स यांना प्रदान केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT