Claudia Goldin Dainik Gomantak
अर्थविश्व

Nobel Prize Economics: हार्वर्डच्या प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर!

Claudia Goldin: क्लॉडिया गोल्डिन या हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्रोफेसर आहेत.

Manish Jadhav

Nobel Prize Economics: हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांना श्रमिक बाजारपेठेतील महिलांवरील संशोधनासाठी सोमवारी अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाले. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस हॅन्स एल्ग्रेन यांनी सोमवारी या पुरस्काराची घोषणा केली. या पुरस्काराने सन्मानित होणार्‍या गोल्डिन या तिसर्‍या महिला आहेत. नोबेल पुरस्कार विजेत्याला 1 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस दिले जाते. दरम्यान, क्लॉडिया गोल्डिन या हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्रोफेसर आहेत. 1989 ते 2017 या काळात त्या NBER च्या डेव्हलपमेंट ऑफ यूएस इकॉनॉमी प्रोग्रामच्या संचालक होत्या. त्या NBER च्या जेंडर इन द इकोनॉमी ग्रुपच्या सह-संचालक देखील आहेत.

दरम्यान, गोल्डिन यांच्या संशोधनात महिला कामगार शक्ती, कमाईतील जेंडर गॅप, उत्पन्न असमानता, तांत्रिक बदल, शिक्षण आणि इमिग्रेशन यासह विविध विषयांचा समावेश आहे. त्यांचे बरेचसे संशोधन भूतकाळाच्या दृष्टीकोनातून वर्तमानाचा अर्थ लावते आणि वर्तमानातील चिंतेच्या समस्यांचे मूळ शोधते. त्यांचे सर्वात अलीकडील पुस्तक म्हणजे करिअर अँड फॅमिली: अ सेंच्युरी ऑफ वुमन—द लाँग जर्नी टूवर्ड इक्विटी (प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस, 2021) आहे.

दुसरीकडे, अमेरिकन अर्थव्यवस्थेतील महिलांवरील महत्त्वपूर्ण कामासाठी गोल्डिन यांना ओळखले जाते. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांना श्रमिक बाजारपेठेतील महिलांवरील संशोधनासाठी सोमवारी अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाले.

नोबेल समितीने पुरस्काराच्या घोषणेदरम्यान सांगितले की, गोल्डिन यांच्या संशोधनाने महिलांच्या कमाईचा आणि श्रम बाजारातील परिणामांचा शतकानुशतके पहिला सर्वसमावेशक लेखाजोखा उपलब्ध करुन दिला आहे. समितीने पुढे सांगितले की, त्यांचे संशोधन नव्या पॅटर्नची ओळख, बदलाची कारणे आणि जेंडर गॅपबद्दल माहिती देते. विसाव्या शतकात, स्त्रियांच्या शिक्षणाची पातळी हळूहळू वाढली आणि बहुतेक उच्च-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ते आता पुरुषांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहेत.

बक्षीस म्हणून नऊ लाख सात हजार डॉलर्स मिळतील.

अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा अर्थशास्त्र क्षेत्रातील Sveriges Riksbank पुरस्कार विजेत्याला 10 दशलक्ष स्वीडिश क्रोना म्हणजे सुमारे नऊ लाख सात हजार डॉलर्स दिले जातात. गेल्या वर्षीचा पुरस्कार यूएसस्थित अर्थशास्त्रज्ञ बेन बर्नान्के, डग्लस डायमंड आणि फिलिप डायबविग यांना बँका आणि आर्थिक संकटांवर केलेल्या कामासाठी देण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT