Nitin Gadkari Dainik Gomantak
अर्थविश्व

Toll Tax Rules: नितीन गडकरींची घोषणा, टोल टॅक्सच्या नियमात मोठा बदल!

Toll Tax New Rules: 2024 पूर्वी देशात 26 ग्रीन एक्स्प्रेस वे बांधले जातील आणि टोल टॅक्ससाठी नवीन नियमही जारी केले जातील, असे गडकरींनी सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

Nitin Gadkari On Toll Tax: महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही हायवेवरुन प्रवास करत असाल आणि टोल टॅक्सची काळजी करत असाल तर आता तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. नितीन गडकरींनी टोल टॅक्सबाबत मोठी घोषणा केल्याने कोट्यवधी वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. 2024 पूर्वी देशात 26 ग्रीन एक्स्प्रेस वे बांधले जातील आणि टोल टॅक्ससाठी नवीन नियमही जारी केले जातील, असे गडकरींनी सांगितले आहे.

टोल टॅक्स तंत्रज्ञान बदलेल

ग्रीन एक्स्प्रेस वे बनल्यानंतर रस्त्यांच्या बाबतीत भारत (India) अमेरिकेच्या बरोबरीत येईल. यासोबतच टोल टॅक्स वसूल करण्यासाठी नियम आणि तंत्रज्ञानामध्ये मोठे बदल करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

टोल टॅक्स वसुलीसाठी सरकारकडे दोन पर्याय

येत्या काही दिवसांत टोल वसुलीसाठी दोन पर्याय देण्याचा सरकारचा विचार आहे. यामध्ये, गाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवणे हा पहिला पर्याय आहे. तर दुसरा पर्याय आधुनिक नंबर प्लेटशी संबंधित आहे. सध्या त्यासाठी नियोजन सुरु आहे.

शिक्षेची तरतूद नाही

माहिती देताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, 'टोल टॅक्स न भरल्यास कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची तरतूद नाही.' यासोबतच आगामी काळात टोल टॅक्स वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले.

खात्यातून थेट पैसे कापले जातील

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, 'आतापर्यंत टोल न भरल्यास शिक्षेची तरतूद नाही, मात्र टोलबाबत विधेयक आणण्याची तयारी सुरु आहे. आता थेट तुमच्या बँक खात्यातून टोल टॅक्स वसुल केला जाईल. त्यासाठी वेगळी कारवाई केली जाणार नाही. आता टोल टॅक्स भरावा लागणार नाही, थेट तुमच्या खात्यातून रक्कम कापली जाईल, असे नितीन गडकरींनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT