Nitin Gadkari Dainik Gomantak
अर्थविश्व

Nitin Gadkari On Toll: गडकरींनी केली मोठी घोषणा, वाहनचालकांचे पुन्हा बल्ले-बल्ले

Nitin Gadkari On Toll Tax: 2024 पूर्वी देशात 26 हरित द्रुतगती मार्ग तयार होतील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Nitin Gadkari On Toll Tax: 2024 पूर्वी देशात 26 हरित द्रुतगती मार्ग तयार होतील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. रस्त्यांच्या बाबतीत भारत अमेरिकेच्या बरोबरीने असेल. यासोबतच आगामी काळात टोल कर वसुलीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले. आतापर्यंत टोल न भरल्यास शिक्षेची तरतूद नाही, मात्र टोलबाबत विधेयक आणण्याची तयारी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्र्यांनी दिली मोठी माहिती

नितीन गडकरी (Nitin Gadkari) पुढे म्हणाले की, 'टोल वसूल करण्यासाठी दोन पर्यायांचा विचार केला जात आहे. पहिला पर्याय गाड्यांमध्ये 'जीपीएस' यंत्रणा बसवण्याशी संबंधित आहे, तर दुसरा पर्याय आधुनिक नंबर प्लेट्सशी संबंधित आहे. काही काळापासून नवीन नंबर प्लेटवर भर दिला जात आहे, आणि पुढील एका महिन्यात एक पर्याय निवडला जाणे अपेक्षित आहे. नवीन प्रणाली लागू झाल्यावर टोल नाक्यावर गर्दी होणार नाही आणि वाहतुकीवरही परिणाम होणार नाही.'

आता काय नियम आहे?

गडकरी पुढे असेही म्हणाले की, 'सध्या टोल मार्गावर एखाद्या व्यक्तीने 10 किमीचे अंतर कापल्यास त्याला 75 किमीचे शुल्क भरावे लागते, परंतु नवीन प्रणालीमध्ये जेवढे अंतर कापले तेवढेच शुल्क आकारले जाईल.' दुसरीकडे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आर्थिक संकटातून जात असल्याचे त्यांनी नाकारले. शेवटी ते म्हणाले की, 'NHAI ची स्थिती पूर्णपणे ठीक आहे आणि त्यात पैशांची कमतरता नाही. यापूर्वी दोन बँकांनी (Bank) कमी दराने कर्ज दिले होते. रस्त्यांच्या निर्मितीमुळे अनेक शहरांमधील अंतर कमी होईल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT