Nitin Gadkari Dainik Gomantak
अर्थविश्व

Toll Tax Rules: नितीन गडकरींची मोठी घोषणा, टोल टॅक्सच्या नियमात बदल होणार; FASTag मधून...

Nitin Gadkari On Toll Tax: काही दिवसांपासून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

Nitin Gadkari On Toll Tax: काही दिवसांपासून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकसभेत बोलताना गडकरी म्हणाले की, देशात लवकरच 26 ग्रीन एक्स्प्रेस वे तयार केले जातील. टोल टॅक्ससाठीही नवीन नियम जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्र्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महामार्गावरील प्रवासाशी संबंधित बदलांची माहिती देण्यात आली आहे. परिवहन विभागाने केलेल्या या बदलांचा फटका कोट्यवधी वाहनचालकांना बसणार आहे.

रस्त्यांच्या बाबतीत भारत अमेरिकेशी बरोबरी करेल

ग्रीन एक्स्प्रेस वेच्या निर्मितीनंतर दिल्ली ते डेहराडून आणि दिल्ली ते हरिद्वार हे अंतर दोन तासांत कापता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरींनी सांगितले की, कटरा दिल्लीहून (Delhi) सहा तासांत आणि जयपूरहून दिल्लीला अडीच तासांत पोहोचता येते. ग्रीन एक्स्प्रेस वे च्या निर्मितीनंतर रस्त्यांच्या बाबतीत भारत अमेरिकेच्या बरोबरीचा होईल. ग्रीन एक्स्प्रेसच्या स्थापनेमुळे टोल टॅक्स वसूल करण्याचे नियम आणि तंत्रज्ञानामध्ये बदल होणार असल्याचेही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

कारमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे

ग्रीन एक्स्प्रेस वेच्या निर्मितीसोबतच आगामी काळात टोल टॅक्सच्या वसुलीसाठीही सरकार नव्या पर्यायाचा विचार करत आहे. यामध्ये पहिल्या पर्यायांतर्गत गाड्यांमध्ये 'जीपीएस' यंत्रणा बसवता येऊ शकते. यामध्ये गाडीच्या 'जीपीएस'वरुन मिळणाऱ्या लोकेशनच्या आधारे टोल टॅक्स (Toll Tax) आकारला जाणार आहे. एक्स्प्रेस वेपासून कार वेगळी होताच किलोमीटरनुसार तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले जातील. दुसरा पर्याय, आधुनिक नंबर प्लेटशी संबंधित आहे. त्यासाठीही नियोजन सुरु आहे. म्हणजेच, येत्या काही दिवसांत फास्टॅगमधून पैसे कापले जाणार नाहीत.

दुसरीकडे, सध्या कोणी टोल टॅक्स न भरल्यास त्यात कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची तरतूद नाही, असेही गडकरी म्हणाले. मात्र येत्या काही दिवसांत यावरही विधेयक आणण्याची तयारी सुरु आहे. यानंतर जर कोणी टोल टॅक्स भरण्यास टाळाटाळ करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 3 सख्या बहिणींवर पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार; रक्षाबंधनाच्या दिवशीच प्रकरण उघड

Goa University: गोवा विद्यापीठाचा आलेख सातत्याने का उतरतो आहे? कुलगुरूंचे ‘राम’राज्य

AFC Champions League 2: FC Goa समोर ओमानमधील अल सीब क्लबचे खडतर आव्हान, सुपर कपनंतर रंगणार सामना

Goa Comunidade Land: हिमाचल प्रदेश सरकारने गोव्याप्रमाणेच कायदा केला, परंतु न्यायालयाने तो अवैध ठरवला; कोमुनिदाद विधेयक

Goa Live News: गोवा बीच सफाई कामगारांना सूचना न देता कामावरून काढले

SCROLL FOR NEXT