Nitin Gadkari: Delhi-Mumbai Express Way will give toll tax to central government near about 1500cr every month Facebook @nitingadkari
अर्थविश्व

गडकरींचा प्लॅन,दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेतून केंद्राला दरमहा 1,500 कोटींचे उत्त्पन्न

हा बहुप्रतिक्षित एक्सप्रेस (Delhi-Mumbai Express Way) वे 2023 मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री (Minister of Road Transport and Highways of India) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे की एकदा दिल्ली-मुंबई द्रुतगती (Delhi-Mumbai Expressway) मार्ग कार्यान्वित झाल्यावर केंद्र सरकारला (Central Government) दरमहा 1,000 ते 1,500 कोटी रुपयांचा टोल महसूल (Toll Tax) मिळणार आहे. हा बहुप्रतिक्षित एक्सप्रेस वे 2023 मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. गडकरींनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ला 'सोन्याची खाण' म्हणून संबोधले असून गडकरींनी अलीकडेच दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी स्वतः एक लांबचा प्रवास पूर्ण केला आहे. (Delhi-Mumbai Express Way will give toll tax to central government near about 1500cr every month)

ते म्हणाले की एनएचएआयचे वार्षिक टोल उत्पन्न पुढील पाच वर्षांत वाढून 1.40 लाख कोटी रुपये होईल. सध्या ते 40,000 कोटी रुपये इतके आहे.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे चार राज्यांतून जाणार

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग राष्ट्रीय राजधानी क्षेत्राव्यतिरिक्त चार राज्यांमधून जाईल. हा 8 लेनचा एक्सप्रेसवे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून जाईल. यासह, राष्ट्रीय राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी दरम्यानचा प्रवास सध्याच्या 24 तासांच्या तुलनेत 12 तासांपेक्षा निम्मा होणार आहे.

केंद्राला मिळणार दरमहा 1000 ते 1500 कोटी रुपये

गडकरी म्हणाले, एकदा दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग कार्यान्वित झाला आणि लोकांसाठी खुला झाला, तर तो केंद्राला दरमहा 1,000 ते 1,500 कोटी रुपयांचा टोल महसूल देईल.रस्ते वाहतूक मंत्री म्हणाले की, देशातील राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा ही जागतिक दर्जाची यशोगाथा आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे बांधकाम मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. हे 'भारतमाला योजना' च्या पहिल्या टप्प्यांतर्गत बांधले जात आहे.

NHAI ची कमाई 5 वर्षात 1.40 कोटी रुपयांवर पोहचेल

एनएचएआयवर कर्जाचा भार खूप जास्त आहे या चिंतेत गडकरी म्हणाले की नोडल एजन्सीला 'ट्रिपल ए' रेटिंग मिळाले आहे आणि त्याचे सर्व रस्ते प्रकल्प उत्पादक आहेत.ते म्हणाले की एनएचएआय कर्जाच्या जाळ्यात नाही. ही सोन्याची खाण आहे. NHAI चे टोल उत्पन्न पुढील पाच वर्षांत वार्षिक 1.40 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. तर ते आता 40,000 कोटी रुपये इतके आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Jetty: कुटबण जेटीवर SOP लागू! मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन; कामगारांची तपासणी सुरू

Bhausaheb Bandodkar: गोवा मुक्त होण्यापूर्वी, अनेक भागांत ‘भाऊसाहेब’ हे नाव लोकप्रिय होते..

David Warner: डेव्हिड वॉर्नरची 'कमाल', 'या' बाबतीत विराटला टाकलं मागे; आता शोएब मलिकच्या विक्रमावर डोळा

Ganesh Chaturthi: 'तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता'! आगमनाची तयारी सुरु; माटोळी, वाद्ये, नैवेद्यासाठी बाजारात गर्दी

Goa Crime: 3 सख्या बहिणींवर पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार; रक्षाबंधनाच्या दिवशीच प्रकरण उघड

SCROLL FOR NEXT