Nirmala Sitharaman  Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax Return Filing: इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मोठी भेट, आता रिफंडमध्ये मिळणार जास्त पैसे मिळणार; अर्थमंत्र्यांनी दिली माहिती!

Income Tax Return Filing: तुम्हीही इन्कम टॅक्स भरत असाल आणि तुम्ही अजून टॅक्स फाइल केला नसेल, तर ही तुमच्या कामाची बातमी आहे.

Manish Jadhav

Income Tax Return Filing: तुम्हीही इन्कम टॅक्स भरत असाल आणि तुम्ही अजून टॅक्स फाइल केला नसेल, तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. यावेळी तुम्हाला इन्कम टॅक्स (ITR फाइल) भरण्यासाठी रिफंडच्या स्वरुपात मोठी रक्कम मिळणार आहे.

आज आम्‍ही तुम्‍हाला टॅक्स भरण्‍याची अशी पद्धत सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला रिटर्नमध्‍ये अधिक पैसे मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. जेणेकरुन तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळू शकेल.

1. टॅक्स रिजीम निवडण्यापूर्वी लक्षात ठेवा

सर्वप्रथम, तुम्हाला या वेळी काळजी घ्यावी लागेल की, कर भरताना, योग्य कर प्रणाली निवडणे आवश्यक आहे. यानंतरच तुम्ही परताव्यासाठी दावा करु शकाल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले होते, जे तुम्हालाही तपासण्याची गरज आहे.

2. बँक खाते सत्यापित करा

रिफंडचे पैसे आयकर विभागाकडून (Income Tax Department) फक्त वैध बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. तुम्हालाही तुमचा परतावा कोणत्याही अडचणीशिवाय आणि त्वरीत मिळवायचा असेल, तर नक्कीच त्याची पडताळणी करा. यासोबतच पोर्टलवर योग्य रिटर्न फाइल करा.

3. बचत योजनेत पैसे गुंतवा

याशिवाय, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजना, पीपीएफ, सुकन्या समृद्धी यासारख्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून तुम्ही कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, तुम्हाला गृहकर्जाच्या व्याजावर सवलतीचा लाभही मिळतो. या व्यतिरिक्त, आपण डेटा मॅच करणे आवश्यक आहे.

4. ITR सत्यापित करणे आवश्यक

तुम्‍हाला आयकर रिटर्न भरल्‍याच्‍या 30 दिवसांनंतर तुमच्‍या रिटर्नची पडताळणी करावी लागेल, कोणतेही रिटर्न जे पडताळले गेले नाही ते सरकारकडून ते अवैध मानले जाते. म्हणूनच तुम्हाला ते सत्यापित करणे आवश्यक आहे.

5. तारखेपूर्वी ITR फाइल करा

तुम्ही तुमचा कर नेहमी वेळेवर भरला पाहिजे. यावेळी कर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे, त्यामुळे तुम्हाला त्यापूर्वी कर भरावा लागेल. हे तुम्हाला दंडापासून वाचवेल. यासोबतच तुमचा रिफंडही तुमच्या खात्यात वेळेवर येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Naik: गोव्याच्या राजकारणाला वळण देण्याची हिकमत असलेला नेता 'रवी नाईक'

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

Goa Accident: पेडणेजवळ थरार! महिंद्रा कार खांबावर आदळली, गाडीचा चक्काचूर; नवरा-बायको गंभीर जखमी

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

SCROLL FOR NEXT