अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी आर्थिक सर्वेक्षण 2021-22 चा अहवाल सादर केला आहे. या आर्थिक सर्वेक्षण अहवालात वर्ष 2022-2023 चा सरकारचा अर्थसंकल्प (Union Budget)सादर होण्यापूर्वी अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा तपशील दिला. आर्थिक सर्वेक्षण एप्रिल 2022 - मार्च 2023 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर हा 8 ते 8.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Union Budget Updates 2022)
राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने (NSO) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आर्थिक विकास दर हा 9.2 टक्के असू शकतो. 2021-22 च्या पुनरावलोकनामध्ये अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांची स्थिती तसेच विकासाला गती देण्यासाठी करावयाच्या सुधारणांचा तपशील देण्यात आला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 7.3 टक्के घट झाली होती. आर्थिक सर्वेक्षण भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती मजबूत करण्यासाठी पुरवठ्याच्या बाजूच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करते असते. काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारलेल्या देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वर यांचे हे पहिले आर्थिक सर्वेक्षण आहे.
कृषी क्षेत्राची वाढ राहणार 3.9 टक्के
या आर्थिक सर्वेक्षण अहवालात चालू आर्थिक वर्षात कृषी (Agricultural) क्षेत्राची वाढ ही 3.9 टक्के राहणार तर औद्योगिक वाढ ही 11.8 टक्के राहील. तसेच, सेवा क्षेत्राच्या वाढीचा दर हा 8.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. बांधकाम क्षेत्राचा विकास दर हा 10.7% अपेक्षित आहे. 2021-22 दरम्यान, ग्रॉस फिक्स्ड कॅपिटल फॉर्मेशन (GFCF) हा 15% सह प्री-कोविड स्तरावर पोहोचू शकते.
शेअर बाजार कडाडला
या आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत 89,000 कोटी रुपयांहून अधिक आयपीओद्वारे उभारण्यात आल्याचेही इकॉनॉमी सर्व्हेमध्ये म्हटले आहे. या सर्वेक्षणात महागाईचा दर हा नियंत्रणात राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. आणि ही अर्थव्यवस्थेसाठी चांगली बाब आहे. जर महागाई आटोक्यात राहिल्यास रिझर्व्ह बँकेवर रेपो वाढवण्याचा फारसा दबाव राहणार नाही. जेनेकरून कर्ज महाग होणार नाही. आर्थिक सर्वेक्षणान अहवाल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात कमालीची वाढ झाली आहे. सेन्सेक्स 1000 अंकांच्या वर गेला आहे. सकाळी शेअर(Share Market) बाजार जोरदार उघडले होते. आर्थिक सर्वेक्षणात वाढीच्या उच्च अंदाजामुळे शेअर बाजार झळाळी दिसत आहे. आज दुपारी 1:13 वाजता सेन्सेक्सने 1052 अंकांनी उसळी घेत 58,253 च्या वर पोहोचला आहे.
काय आहे आर्थिक सर्वेक्षण
एक प्रकारे हा अर्थव्यवस्थेचा वार्षिक अधिकृत अहवाल आहे. याद्वारे सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी स्थिती काय आहे ते कळते. यामध्ये भविष्यात करायच्या योजना आणि अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने सांगितली जातात. तसेच सर्वेक्षण अहवालात देशाच्या आर्थिक विकासाचाही अंदाज लावला जातो. तसेच येणाऱ्या आर्थिक वर्षाची ब्लू प्रिंटही पाहणी अहवालात मांडल्या जाते. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढेल की मंदावेल याबाबत माहिती दिली जाते. शिवाय सरकारला सर्वेक्षणातून काही शिफारशीही दिल्या जातात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.