FM Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेतील बँकांचे अपयश आणि क्रेडिट सुईससमोर आलेले संकट यादरम्यान मोठा निर्णय घेतला आहे.
अर्थमंत्र्यांनी 25 मार्च रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात भारतात अशी परिस्थिती उद्भवू नये, हे लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बँकांच्या प्रमुखांसोबत अर्थमंत्र्यांची ही पहिलीच बैठक असेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पात (Budget) ठळक केलेल्या बाबींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासोबतच देशातील आर्थिक घडामोडींवरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सूत्रांनी सांगितले की, सीतारामन कृषीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील कर्ज प्रवाहाचा आढावा घेऊ शकतात.
विविध सरकारी योजनांतर्गत सरकारी बँकांनी निर्धारित केलेल्या उद्दिष्टांचाही या बैठकीत आढावा घेतला जाईल.
जसे की, इमर्जन्सी क्रेडिट लाइन हमी योजना, किसान क्रेडिट कार्ड आणि मुद्रा योजना इ. सूत्रांनी सांगितले की, वित्तमंत्री इतर मुद्द्यांसह अनुत्पादित मालमत्ता, कर्ज वाढ आणि मालमत्तेची गुणवत्ता यांचाही आढावा घेतील.
एका सूत्राने सांगितले की, या बैठकीत किसान क्रेडिट कार्ड (KCC), स्टँड-अप इंडिया, प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) आणि आपत्कालीन क्रेडिट हमी योजना (ECLGS) यांसारख्या विविध सरकारी योजनांसाठी निर्धारित लक्ष्य साध्य करण्यासाठी बँकांवर चर्चा केली जाईल. किती प्रगती झाली याचाही आढावा घेतला जाईल.
अर्थसंकल्प 2023-24 नंतरची ही पहिली पूर्ण आढावा बैठक आहे. या बैठकीत पुढील आर्थिक वर्षातील कर्जवाढ, मालमत्तेचा दर्जा, भांडवल उभारणी आणि व्यवसाय वृद्धीसाठी बँकांच्या (Bank) योजनांचाही अर्थमंत्री आढावा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.