Nirav Modi News, PNB Scam News Updates Dainik Gomantak
अर्थविश्व

PNB Scam: नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकरला 26 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी

नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकरला 26 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी देेण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

PNB Scam News: फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकर परब याला 26 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या 13,578 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सुभाष शंकर परब याला कैरो, (Egypt) मधून भारतात आणण्यात सीबीआयला (CBI) यश आले. अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की, 'परब हे फायरस्टार डायमंडचे उपमहाव्यवस्थापक (Finance) होते. नीरव मोदी (Nirav Modi) आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी (Mehul Choksi) यांच्याशी संबंधित प्रकरण समोर आल्यापासून परब फरार होता.' केंद्रीय तपास यंत्रणेला मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने मोठी कारवाई करत त्याला पकडले आहे. (Nirav Modi's accomplice Subhash Shankar remanded in CBI custody till April 26)

सीबीआयने यापूर्वीच नीरव मोदी, निशाल मोदी यांच्यासह सुभाष शंकर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. 2018 मध्ये, इंटरपोलने नीरव, त्याचा भाऊ निशाल मोदी आणि त्याचा कर्मचारी सुभाष यांच्या विरोधात $2 अब्ज PNB घोटाळ्याची चौकशी करणार्‍या सीबीआयच्या विनंतीवरुन रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT