PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Vande Bharat Train: PM मोदी उद्या देशाला देणार मोठी भेट, या मार्गावरही धावणार वंदे भारत एक्सप्रेस

Vande Bharat Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशाला चौथी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन देणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Vande Barat Express Train In Himachal: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशाला चौथी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन देणार आहेत. उना ते दिल्ली दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन मोठी भेट असणार आहे. त्याचवेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रयत्नातून ऊना थेट गुजरातशी रेल्वेमार्गे जोडले गेल्याचे भाजपचे मत आहे. दिल्लीहून ही ट्रेन पुन्हा अंबालापर्यंत जाईल.

रुट काय आहे?

ही ट्रेन दिल्लीहून (Delhi) उनासाठी सकाळी 5.50 वाजता सुटेल आणि सकाळी 8.50 वाजता अंबाला येथे पोहोचेल. म्हणजेच ट्रेन सकाळी 10:34 वाजता उना रेल्वे स्थानकावर असेल आणि इथे दोन मिनिटे थांबल्यानंतर 11:05 वाजता आंब-अंदौरा येथे पोहोचेल. ही ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. यात 1000 प्रवासी क्षमता असलेले एकूण 16 डबे असतील. ही ट्रेन उना ते दिल्ली हा प्रवास अवघ्या 5 तासात पूर्ण करेल.

पीएम मोदी सुरुवात करतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 13 ऑक्टोबर रोजी उना जिल्ह्यात मुक्काम करणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी सुमारे 7981 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. या कार्यक्रमात पंतप्रधान हरोली, उना येथे 1923 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या बल्क ड्रग पार्कची पायाभरणी करतील. त्याचवेळी 5930 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उना-हमीरपूर रेल्वे मार्गाची पायाभरणी आणि 128 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (Triple IT)चे उद्घाटन होणार आहे.

हिमाचलसाठी मोठी भेट

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. उना ते दिल्ली दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी भेट आहे. अंबाला विभागाचे रेल्वे व्यवस्थापक गुरविंदर मोहन यांनी सांगितले की, हिमाचलहून दिल्लीला जाताना ट्रेनचे पहिले स्टेशन अंब अंदौरा असेल. तर पुढे दिल्लीहून ते उनापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) धावेल. त्यानंतर शेवटचे स्टेशन अंब अंदौराच असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Comeback: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! अफगाणिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याचं होणार कमबॅक; चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

Mitchell Starc World Record: रेकॉर्ड ब्रेक! मिचेल स्टार्कनं रचला इतिहास; कसोटी क्रिकेटमध्ये ठरला सर्वाधिक विकेट्स घेणारा डावखुरा गोलंदाज

FC Goa vs FC Arkadag: एफसी गोवाची झुंजीनंतर हार, एफसी अर्कादाग संघाचा 3-0 दणदणीत विजय

Congo Ebola Outbreak: कांगोत इबोला व्हायरसचा हाहाकार! 20 दिवसात 1000 जणांचा मृत्यू, 4000 हून अधिक लोक मृत्यूच्या दाढेत; 10 वर्षांतील सर्वात मोठा उद्रेक

Shravan Month: क्षणात सर, क्षणात सोनेरी ऊन अन् चहूकडे हिरवाईचा साज! निसर्गसौंदर्य आणि सणांची पवित्र अनुभूती देणारा श्रावण पुन्हा अवतरला

SCROLL FOR NEXT